सोलापूर // प्रतिनिधी
कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज) यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे धमकी पत्र पाठविणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त श्री. निलेश येलगुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना निलंबित करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली मा . जिल्हाधिकारी यांना देण्यात आली .
सदर निवेदनात सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत झालेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदणी संदर्भी आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आपल्या मार्फत चौकशी व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत . या बांधकाम कामगार बोगस नोंदणी संदर्भी आपण योग्य दिशेने कामकाज सुरू केले आहात म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस येणार आहे . या भितीपोटी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत दि. २५ जानेवारी २०२१ रोजी पोस्टाद्वारे पत्र पाठवून माझ्यावर विनयभंगाची गुन्हा दाखल झालीच समजा . अशी धमकी पत्र पोस्टाने पाठविले आहे . यावरुन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून व त्यांच्या गुंड साथीदाराकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा व मला जीव मारण्याचे शक्यता नाकारता येत नाही.
तरी माननीयांनी या पत्राबाबत गंभीरतेने घेऊन माझ्यावर होणारे अन्याय दूर करावे. व मला संरक्षणासाठी पोलीस खात्यास आदेश द्यावेत. ही नम्र विनंती. असे नमुद करण्यात आहे.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात सुबोध वाघमोडे, शिवा ढोकळे, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, गणेश म्हंता, श्रीराम सेनेचे अध्यक्ष :- बिपीन साबळे, प्रशांत जक्का आदिंचा समावेश होता.
सदर निवेदनाची पत्र *मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. पालकमंत्री सोलापूर जिल्हा, मा. पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर यांना ही पाठविण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.