धूम्रपान कायद्यामुळे विडी कामगारांवर आले संकट:- विष्णु कारमपुरी (महाराज)

 




सोलापूर // प्रतिनिधी 

२००४ साली लागू झालेल्या धुम्रपान कायद्यात अटी दिवसेंदिवस जाचक बनत आहेत. सध्यातर सन २०१९ -२० मध्ये १०० % आरोग्य धोकादायक सुचना लावण्याचे या नियमात समाविष्ट केला आहे. म्हणून धुम्रपान कायद्यामुळे विडी उद्योगातील सर्व कामगारांवर बेकारीचे संकट येणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी कामगार सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विडी कामगारांच्या बैठकीत बोलतांना केले. 
           केंद्र शासनाने धुम्रपान कायद्याबाबत सन २०१९ - २० या सालाकरिता तंबाकुजन्य पदार्थावर नविन नियमांचा समाविष्ट करण्यात आला आहे . यामुळे आगोदरच संकटात असलेला विडी उद्योग पूर्णपणे बंद पडण्याचा मार्गावर आहे. जर विडी उद्योग बंद पडल्यास विडी उद्योगात काम करणाऱ्या सोलापूरातील ६० ते ७० हजार कामगार, महाराष्ट्रातील ५ लाख कामगार आणि संपूर्ण देशातील २ कोटी कामगार बेकार होणार आहेत. म्हणून याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने धुम्रपान कायदा बाबतीत केंद्र शासनाने मागविलेल्या सुचनांमध्ये धुम्रपान कायद्याचे नियम शितील करावे. अशी मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल . असा इशारा या बैठकीत दिले . सदर कामगार सेनेच्या धुमपान विरोधी आंदोलनात सर्व विडी कामगार बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन केले. 
           महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने धुम्रपान कायदा विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कामगार सेना कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे . सदर बैठकीचे अध्यक्षतेस्थानी दशरथ नंदाल हे होते, प्रमुख उपस्थिती पद्याताई म्हंता, श्रीनिवास चिलवेरी , या बैठकीस पद्माताई म्हंता, श्रीनिवास चिलवेरी यांनीही धुम्रपान विरोधी कायदा विरोधात मार्गदर्शन केले. आभारप्रदर्शन विठ्ठल कुल्हाडकर यांनी मांडले. सुत्रसंचलन श्रीशैल वाघमोडे यांनी केले.
          सदर बैठकीत पप्पु शेख , बिपीन साबळे , गणेश म्हंता , प्रशांत जक्का , शिवानंद येरटे , नागार्जुन कुसुरकर , अर्चना चिलका अनिता बटगिरी, संध्याराणी कु -हाडकर , विडी कामगार बंधु भगिनी आणि कामगार सेना पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget