खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचा दरवाढ करुण जनतेचा विश्वासघात करतोय :- अंबादास आबा करगुळे




 सोलापूर // प्रतिनिधी

खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने इंधन दरवाढ करुण जनतेचा विश्वासघात करत आहे म्हणुन इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञान प्रबोधीनी शाळा येथून सुपर पेट्रोल पंपापर्यंत चार चाकी गाड़ी ओढ़त नेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करुण प्रतीकात्मक विश्वासघात आंदोलन करण्यात आले.


यावेळी बोलताना शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की 2014 व 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारने प्रचंड खोटे आश्वासने देऊन सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. त्याच प्रमाणे देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असुन युवा, महिला, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक मोदी सरकारच्या चुकीच्या धोरनामुळे त्रस्त असुन, निवडणुकीपूर्वी वारेमाफ आश्वासने देणारे मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ करुण जनतेच्या खिश्यावर डल्ला मारण्याचे आणि जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. असेच ईंधन दरवाढ होत रहिल्यास जनतेला आपला गाड्या ढकलत न्यावे लागतील म्हणुन आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.


यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, अभी राठोड, गोविंद कांबळे, संजय गायकवाड़, अभिषेक बंटी गायकवाड़, किरण राठोड, अभीषेक गायकवाड़, शाहु सलगर, सुभाष वाघमारे, राज जगजाप, मनोहर माचर्ला, सतीश संगा, आनंद पुंडा, नरेश महेश्वरम, राकेश मंथेन, अमोल माशाळे, धम्मदिप जगजाप, लालू सानी, बसु अन्ना कोळी, सौरभ सालुंखे, यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget