पंढरपूर // प्रतिनिधी
आमचा गाव आमचा विकास अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील सर्व विस्ताराधिकारी ग्रामसेवक सरपंच यांना ग्रामपंचायतीचा विकास आराखडा सन 2021/ 22 करिता तयार करणेबाबत आज पंढरपूर तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना करून करण्यात आली. यावेळी यशदा संस्थेचे मार्गदर्शक श्री कादे यांनी ग्रामसेवक सरपंच यांना विकास आराखडा करणे संदर्भातील माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले .
या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती सौ. व्हरगर उपसभापती देशमुख गट विकास अधिकारी श्री रविकिरण घोडके
गट शिक्षण अधिकारी सिडीपीओ अधिकारी. सर्व विभागाचे विस्ताराधिकारी आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक तालुका तांत्रिक अधिकारी स्थापत्य. अंगणवाडी पर्यवेक्षिका महिला बालकल्याण सरपंच व ग्रामसेवक प्रशासक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.