पंढरपूर // प्रतिनिधी
आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग च्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वळवण्यात आला होता. या दोन्ही महत्त्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांनी वाखरी- सरगम चौक ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पर्यंत व पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव) तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत या दोन्हीही भागाची आज आमदार प्रशांत परिचारक यांनी समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) प्रकल्प संचालक श्री. बोडके, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अनिकेत मानूरकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंढरपूरचे श्री. गावडे, श्री. बागल उप अभियंता बांधकाम विभाग यांनी पाहणी केली.
मा. नितीन गडकरी यांनी सदर रस्ता वाकरी ते श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर व पंढरपूर ते गोसावी वाडी (देगाव) पर्यंत करण्यास हिरवा कंदील दिला आहे. विषय म्हणजे याची त्यांनी तातडीने अंमलबजावणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामुळे बुधवारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी पंढरी गाठली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते वाकरी पर्यंत व गोसावीवाडी (देगाव) त्यांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये सरगम चौक येथे ओव्हर ब्रिज करता येईल का? याची चर्चा करण्यात आली.
या रस्त्यावरून ज्ञानोबा-तुकोबा सह शेकडो आषाढीस मार्गक्रमण करतात. त्यांच्याबरोबर लाखो भाविक पायी पंढरीत दाखल होतात. यामुळे वाखरी ते श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा रस्ता कॉंक्रिटचा करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोसावीवाडी इथून शहरासाठी रिंगरोड होणार आहे. तेथपर्यंत हा रस्ता होणार आहे. सदर अधिकाऱ्यांनी या बार किलोमीटर रस्त्याची पाहणी केली.
आमदार प्रशांत परिचारक यांनी अधिकाऱ्यांना वापर येथील रिंगण सोहळा, त्यानंतर दशमीला संध्याकाळी या सर्व पालख्या वाखरीत पंढरपूर हे 6 किमी अंतरावर एकत्रित मार्गक्रमण करतात. त्या मार्गाने सुमारे 15 ते 20 लाख वारकरी चालत येतात. आधी सविस्तर माहिती दिली. वाखरी ते पंढरपूर या ठिकाणी चारपदरी रस्ता आहे. त्याठिकाणी नवीन जमीन भूसंपादीत करण्याची गरज नाही. यामुळे दोन्ही रस्त्याचे अंदाजे 12 किमीचा टप्पा कॉंक्रिटीकरण करून दिल्यास पुढील अनेक वर्षाची वारकऱ्यांची व पंढरपूर कर यांची कायमस्वरूपी सोय होऊन खऱ्या अर्थाने हा आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वाला जाणार आहे.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) प्रकल्प संचालक श्री. बोडके, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंढरपूरचे श्री. गावडे, श्री. बागल उप अभियंता बांधकाम विभाग पंढरपूर, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.