सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर व परिसरात रात्रीचे लॉकडाऊन सुरू असताना पुन्हा कडक लॉकडाऊनच्या अफवा पसरत असून भीतीने शेतकरी आपला माल पृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी, आडत व्यापारी व ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे. वाढलेली गर्दी रोखण्यास प्रशासनही हतबल ठरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग नाही, मास्क नाही, स्वयंशिस्त नाही यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची चिंता सोलापूरकरांना पुन्हा सतावणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाला व फळे मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत. पहाटे पाचपासून भाजीपाला व फळांचा लिलाव सुरू होता. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ व अन्य तालुक्यांतून शेतकरी मोठय़ा संख्येने माल घेऊन येत आहेत. जवळपास सववाशेहून अधिक आडत व्यापारीही लिलाव प्रक्रिया पार पाडतात.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.