वृत्तसंस्था // प्रतिनिधी
"मेडिकल कंडिशन...सर्जरी...मी लिहू शकत नाही", असा अमिताभ बच्चन यांनी लिहलेला ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत त्यांचे विचार व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहलेला असून, तो चर्चेत आहे. या ब्लॉगमुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
अमिताभ यांनी हा ब्लॉग शनिवारी रात्री लिहिला होता. 'मेडिकल कंडिशन...सर्जरी...मी लिहू शकत नाही, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. नक्की शस्त्रक्रिया कसली आहे? कुठे आणि कधी ही शस्त्रक्रिया होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.