सोलापूर // प्रतिनिधी
खेलो इंडिया महाराष्ट्र केंद्रासाठी भारतीय खेळ प्राधिकरणतर्फे शुटिंग या खेळासाठी बालेवाडी, पुणे येथे 19 ते 21 फेब्रुवारी 2021 या कालावधीत निवड चाचणी होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी कळविले आहे.
शुटिंग खेळाच्या प्रवेशासाठी 21 वर्षे वयोगटाच्या खालील खेळाडूंनी सहभागी व्हावे. 19 फेब्रुवारीला 10 मीटर, 25 मीटर, 50 मीटर आणि ट्रॅप आणि स्कीटसाठीचे प्रशिक्षण, 20 फेब्रुवारीला 10 मीटर- एअर रायफल (पुरूष/स्त्री), 25 मीटर- पिस्तोल आणि ट्रॅप तर 21 फेब्रवारीला 10 मीटर-एअर पिस्तोल आणि 50 मीटर 3 पी याविषयीची चाचणी होणार आहे.
अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, जिल्हा क्रीडा कार्यालय, कुमठा नाका, सोलापूर, दूरध्वनी 0217-2607144 येथे संपर्क करण्याचे आवाहन श्री. तारळकर यांनी केले आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.