यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


 

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कारासाठी इच्छुकांनी प्रवेशिका 3 मार्च 2021 पर्यंत संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


             ज्या लेखकांना, प्रकाशकांना पुरस्कारासाठी अर्ज करावयाचा आहे, त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत पुस्तकांच्या दोन प्रती विहित नमुन्यातील अर्जासह जमा करायच्या आहेत.


            अर्ज आणि अधिक माहितीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-400025, दूरध्वनी-022-24325931 किंवा इमेल- secretary.sblc-mh@gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


            संकेतस्थळ https://sahitya.marathi.gov.in यावर संपर्क साधू शकता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget