जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

सोलापूर // प्रतिनिधी  


सामाजिक,क्रिडा,स्वयंरोजगार,पर्यावरण विकासयुवक विकास व राष्ट्रीय एकात्मता आदी क्षेत्रात सन 2019-2020 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळाला जिल्हा विशेष मंडळ पुरस्कार देण्यात येणार आहेत. मंडळांनी पुरस्कारासाठी 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यांनी केले आहे.

            जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या मंडळाला 25 हजार रुपयेराज्य पातळीवर पात्र ठरलेल्या मंडळाला एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर पात्र ठरलेल्या मंडळापैकी प्रथम आलेल्या मंडळास लाख रुपयेद्वितीय क्रमांकाच्या मंडळास 3 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळास लाख रुपये अशा स्वरुपात पुरस्कार देण्यात येतात.

            अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्रजिल्हा ग्राहक न्याय मंचच्या बाजूलाप्रशासकीय इमारतीच्या पाठीमागेसोलापूर अथवा 0217-2325433 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री. अजितकुमार यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget