सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे यांनी बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून कोट्यावधी रुपयांचा शासनाच्या निधीचा गैरवापर केला आहे . म्हणून त्यांना ताबडतोब निलंबित करून सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे नेते विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा . श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे .
मा. पालकमंत्री श्री. भरणे साहेबांना दिलेल्या निवेदनात सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे व त्यांचे कार्यालयातील कर्मचारी मिळून खाजगी दलालांना हाताशी धरून संगनमताने बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचा अनुदानांचे भ्रष्टाचार केला आहे . याबाबत शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सखोल चौकशी करून सबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करतांना सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे यांना निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन मा . जिल्हाधिकारी यांना दि . ०६/०१/२०२१ रोजी दिले आहे . त्याच बरोबर इतर सामाजिक व कामगार संघटनांनी याबाबत निवेदन दिले. त्यावरून मा . जिल्हाधिकारी साहेबांनी सदर बाबी २ ते ३ वेळा महाराष्ट्र कामगार सेना व सहाय्यक कामगार आयुक्तालयाचे अधिकारी व कर्मचारी असे संयुक्त बैठक आयोजित केले. परंतु मा. जिल्हाधिकारी यांनी बोलाविलेल्या कुठल्याही बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत . म्हणून बैठका रद्द करण्यात आले . त्यानंतर दि . २२/१/२०२१ रोजी परत मा . जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली याही बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने मा . जिल्हाधिकारी साहेबांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडून झालेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणी शासकीय उच्च स्तरीय समिती नेमुन चौकशी करावे अशी आश्वासन दिले . परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा समिती नेमली नाही . त्यामुळे अद्यापी सहाय्यक कामगार आयुक्तलयामार्फत बोगस बांधकाम कामगार नोंदणी सुरूच आहे . म्हणजेच शासनाच्या पैशांचे लुटा लुट चालुच आहे.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी येलगुंडे यांचे बेकायदेशीर काम थांबवावे म्हणून वारंवार मा . जिल्हाधिकारी यांना मागणी करीत असल्याने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांना विनयभंगाचे खोटे गुन्हा दाखल करतो अशा धमकीचे पत्र पोस्टाने पाठविण्यात आला आहे . यावरून सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर असून याबाबत ताबडतोब कारवाई होणे गरजेचे आहे . परंतु मा . जिल्हाधिकारी साहेबांकडून होतांना दिसून येत नाही .
तरी माननीयांनी वरील बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून शासनाच्या कोट्यावधी रूपयांचे भ्रष्टाचार करणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना ताबडतोब निलंबित करावी . ही नम्र विनंती . असे नमुद केले आहे .
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा. पालकमंत्री महोदयांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रसाद जगताप , श्रीनिवास बोगा, नागार्जुन कुसूरकर, शिवानंद येरटे, गणेश म्हंता यांच्या समावेश होता.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.