कार्यकर्त्यांनी बूथ आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कष्ट घ्यावेत:प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे
सोलापूर // प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील बूथ मजबुत करण्यासाठीचे हे अभियान असुन मुख्यमंत्री राहीलेले देवेंद्र फडणवीससुद्धा मुंबईच्या एका वार्डात बूथ ची बैठक घेण्यासाठी गेले होते . तसेच ते आणि नीतीनजी गडकरी हे सुद्धा आपापल्या कार्यक्षेत्रात बूथ प्रमुख म्हणून काम करतात याचा आदर्श घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी बूथ आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कष्ट घ्यावेत असे प्रतिपादन भाजपा महीला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांनी केले . मोहोळ येथील शासकीय विश्राम गृह येथे घेण्यात आलेल्या भाजपा च्या "बूथ संपर्क अभियान" मध्ये त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा प्रदेश किसान आघाडीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे होते .उमाताई खापरे पुढे म्हणाल्या
"मोहोळ नगरपरिषदेची निवडणुक वरिष्ठांनी गांर्भियाने घेतली असुन त्यासाठी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकत्यांनी गाफील न रहाता तयारीला लागावे यासाठी जी हवी ती मदत करण्यास तयार आहे . यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील भाजपच्या सद्य :स्थितीची माहिती आणि आढावा व आगामी नियोजन यांची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली .अध्यक्ष स्थानावरून बोलताना शंकरराव वाघमारे यांनी पक्षाची जिल्हा आणि तालुक्यातील स्थिती विशद केली.पूर्वी काम करताना आलेल्या अडचणी आणि सध्या सर्व सोयींनी युक्त असताना करावयाचे पक्षाचे काम याची माहिती त्यांनी दिली .आणि मोहोळ नगरपरिषदेवर भाजपाने पूर्ण बहुमत मिळवावे आणि एक हाती सत्ता यावी यासाठी लागेल ते सहकार्य प्रदेशाकडून मिळवून देऊ असे आश्वासन श्री. वाघमारे यांनी दिले . यावेळी मुंबई भाजपाच्या नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी पक्ष महिला च्या साठी किती सजगतेने काम करत आहे ते सांगीतले. पक्षाने महिलांसाठी देशपातळीपासून बूथपातळी पर्यंत लक्ष घातले आहे. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन काम करावे असे सांगितले . यावेळी भाजप नेते लोकसेवक संजय क्षीरसागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अँड.सौ धनश्री खटके - पाटील यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आला .
तर उमाताई खापरे यांच्या हस्ते जिल्हा स्तरावर निवड झालेल्या बाळासाहेब पवार , लिंगादेव निकम (कुरुल), पांडुरंग बचुटे ( ओंढी) बाळासाहेब पाटील (आष्टी), यासर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंजली काटकर यांचा सत्कार उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आला . सूत्रसंचालन गणेश झाडे यांनी तर आभार मुजूप मुजावर यांनी मानले यावेळी जिल्हा निरीक्षक संतोष मोगले, विजय बुरकुल, पेनूरचे माजी सरपंच रमेश माने, माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे शहराध्यक्ष अविनाश पांढरे, सतीश पाटील, महावीर पुजारी,माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश सोवनी, नगरसेवक सुशील क्षीरसागर,दीपक गवळी, विशाल पवार, मार्केट कमेटी चे माजी उपाध्यक्ष ब्रम्हदेव गोफणे, विष्णुपंत चव्हाण, युवराज ढेरे, जगन्नाथ वसेकर, सागर लेंगरे, दिनेश गडदे, आदी सह अनेकजण उपस्थित होत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.