लॉकडाउन काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प होते आता कुठेतरी हे सर्व चालू झाले असून शेतकऱ्यांच्या दिलासा मिळाला आहे पण या काळातील वीज बिले आव्वाच्या सव्वा शेतकऱ्यांना येऊ लागली हीच विज बिले राज्य सरकारने माफ करावीत अशी सर्व शेतकऱ्यांमधून मागण्या येऊ लागल्या तरी देखील महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नाही. म्हणूनच महा विकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश पातळीवरून उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी भव्य असे संपूर्ण राज्यभर आंदोलने करण्यात येणार असून याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा विधान परीषदेचे आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील लिंकरोड येथील महावितरणच्या कार्यालयावरती भव्य असा धडक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी व
यामध्ये शहरांमधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पांडुरंग परिवाराचे युवक नेते माजी उपसरपंच प्रणव परिचारक यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.