सोलापूर // प्रतिनिधी
गंगामाई नगर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ निवडची परंपरा यावेळी जपली आहे.
या कारखान्याची 2020-21 ते 2025-26 या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध झाली. केवळ बिनविरोध निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. बबनराव शिंदे म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया झाली. 15 फेब्रुवारी 2021 रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जागेसाठी 21 अर्ज वैध ठरल्या आणि सर्वांची बिनविरोध निवड जाहीर झाली असून आता केवळ बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा बाकी आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 1 फेब्रुवारीपासून सुरू होती. यामध्ये उत्पादक गटातून 15, अनु. जाती, जमाती मधून एक, महिला एक, सहकारी संस्था गटातून एक, भटक्या जमाती एक, इतर मागास वर्ग-एक आर्थिक मागास वर्ग-एक असे मिळून 21 जागेसाठी नामनिर्देश शण पत्र मागविण्यात आली होते. सर्व निर्वाचित सदस्यांची अधिकृत घोषणा 21 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घोषणा होणार आहे.
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रासप, शेकाप सर्व शेतकरी संघटना, मनसे व इतर पक्षांनी बहुमोल सहकार्य केले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे अत्यंत आभारी आहे, असे उदगार यावेळी काढले. कारखान्यांनी सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या सहकाऱ्यांने अल्पावधीतच देशात नावलौकिक मिळवलेली आहे. तसेच अल्पावधीत कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार मे. टन वरून 11 हजार मे. टन डिसलरी प्रकल्प 30 केएलपीडीवरून 150 केएलपीडी को. जन प्रकल्प क्षमता 7.5 नेटवरून 38 मे. वेट , रिफाइंड शुगर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहेत.
कारखाने जिल्हा बँकेकडून सरफेसी अॅक्ट 2002 अंतर्गत युनिट नंबर 2 करकंब हा अडीच हजार मे. टन समता व 12.5 मेगावॅट को. जनरेशन प्रकल्प असणारा कारखाना करीत केलेला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत झालेली असून वेळोवेळी सभासद शेतकऱ्यांसाठी निरनिराळी समाजिक उपक्रमाला भूगोल हितसंबंध जोपासली आहेत. यापुढेही सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून कारखाना प्रगती करण्याचा प्रयत्न असेल, असे आ. शिंदे म्हणाले.
(आम्ही आमच्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली असून आमच्या वर पुन्हा एकदा सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी संपुर्णपणे विश्वास दाखवला असून आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून इथून पुढे चांगल्या पद्धतीने व विश्वासाने चांगले कामकाज करून सर्वांना समाधानी करण्याचा प्रयत्न करू)!
(रणजित भैय्या शिंदे)
(बिनविरोध संचालक मंडळ)
:- मा. आ. श्री. बबनराव विठ्ठल शिंदे, मा. श्री. रमेश व्यंकटराव येवलेपाटील, मा. श्री. वामनराव प्रल्हाद उबाळे, मा. श्री. सुरेश मारुती बागल, मा. श्री. पोपट दिगंबर गायकवाड, मा. श्री. अमोल सौदागर चव्हाण, मा. श्री. निळकंठ भगवान पाटील, मा. श्री. शिवाजी महादेव डोके, मा. श्री. लक्ष्मण रामदास खूपसे, मा. श्री. विष्णू महादेव हुंबे, मा. श्री. प्रभाकर गंगाधर कुठे, मा. श्री. भाऊराव भानुदास तरंगे, मा. श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे, मा. श्री. लाला मारुती मोरे, मा. श्री. वेताळ जालिंदर जाधव, मा. श्री. सचिन कल्याण देशमुख, मा. श्री. विक्रमसिंह बबनराव शिंदे, मा. श्री. पांडुरंग देवराव घाडगे, मा. श्री. पोपट बलभीम चव्हाण, मा. सौ. सिंधुताई सुभाष नागटिळक, मा. श्री. संदीप भुजंगराव पाटील यांचे अर्ज बिनविरोध झाले आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.