पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.




पदवीधर आमदार अरुणआण्णा लाड यांचे  पंढरपूरात प्रतिपादन 


पंढरपूर // प्रतिनिधी                 

पदवीधरांच्या अनेक समस्या असून यातून पदवीधरांना न्याय देण्याचे व समस्या सोडविण्यासाठी पुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.अरुणआण्णा लाड यांनी पंढरपूर मध्ये आभार भेट दौऱ्या निमित्त बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे,जिल्हा उपाध्यक्ष युवराजदादा पाटील,सरचिटणीस लतिफ तांबोळी विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके,तालुका अध्यक्ष ॲड.दीपक पवार.शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.राजेश भादुले,शेतकरी कामगार पक्षाचे चंद्रकांत देशमुख,नरसाप्पा देशमुख , माढ्याचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना आम.लाड पुढे म्हणाले की महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणूकीत आपण सर्व मित्रपक्षांच्या मदतीने यश संपादन केले.एकीचे बळ काय असते याची प्रचिती या निवडणूकीत आली.

आतापर्यंत पदवीधर म्हणून निवडून येणाऱ्यांनी पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी कधीही प्रयत्न न केल्याने पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.ते सोडविण्यासाठी पुढील काळात आपल्याला काम करायचं आहे असे सांगून आम.लाड शेवटी म्हणाले की मला विजयी करण्यासाठी महिला आघाडी युवती युवकचे कार्यकर्ते राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी यांनी केलेल्या प्रयत्ना मुळे मला विजय संपादन करता आला  त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

प्रारंभी ॲड.दीपक पवार यांनी प्रास्तविक केले त्यावेळी पदवीधरांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी म्हणुन मोठ्या गावांमध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी पवार यांनी केली.

तर ॲड.गणेश पाटील,राजेश भादुले,चंद्रकांत देशमुख,बळीरामकाका साठे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गिरिष चाकोते,बाळासो पाटील,बाळासो यलमार,हेमंत पाटील,

सचिन कदम,ज्ञानेश्वर अवताडे,सुनिल जाधव मल्हारी पवार तसेच युवकचे प्रदेश सचिव अरूण आसबे,जिल्हा सचिव सुरज पेंडाल तसेच राष्ट्रवादीच्या अनिता पवार, युवती जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले,साधना राऊत,संगिता माने, शुभांगी जाधव,नरसाप्पा देशमुख काँग्रेसचे शंकर सुरवसे,स्वागत कदम यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते. याप्रसंगी ग्रामसेवक संघटना व शिक्षकेतर संघटनेकडून आम.लाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहर सचिव विजय काळे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे  आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget