सोलापूर// प्रतिनिधी
लागणार अशी भीती घालून अनेक व्यापारी द्राक्ष व भाजीपाला उत्पादकांच्या मालाचा दर पाडत आहेत, यामुळे आणि जिल्ह्यातील फळ व भाजीपाला उत्पादक हवालदिल झाले आहेत. या सर्वाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ( ) वाचा: सध्या सांगली जिल्ह्यात जोरात आहे. या भागातील द्राक्षांना देशाच्या विविध भागात मागणी आहे तसेच परदेशातही निर्यातही सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भीती घालून द्राक्षाचा दर कमी केला. आता करोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची भीती घालून आणखी दर कमी करण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहेत. दोन वर्षात आलेला महापूर आणि अवकाळी पाऊस यातून सावरत असतानाच आता कमी दराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून असे दर पाडल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परंतु, करोनामुळे लॉकडाऊन करण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भीती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत. अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. यांनी दिला आहे. वाचा: एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही. करोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी हा इशारा दिला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.