हलसवडे ग्रामपंचायतीवर राजश्री शाहू ग्राम विकास आघाडीची सत्ता




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीत माजी सरपंच अप्पू खोचगे यांच्या राजश्री शाहू ग्राम विकास आघाडीने सत्ता मिळवली. सरपंच पदी शीला राहुल पाटील व उपसरपंचपदी मोहन रावसाहेब खोचगे यांची निवड झाली. सरपंच व उपसरपंच पदासाठी दोन-दोन अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली.सत्ताधारी कडून शीला पाटील व मोहन खोचगे  विरोधी  राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलच्या भिमाबाई कांबळे व महालिंग स्वामी यांचे  अर्ज आले. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवड प्रक्रियेत सरपंच पदासाठी शीला पाटील यांना पाच मते  तर विरोधी  भिमाबाई कांबळे यांना चार मते मिळाली. उपसरपंच पदासाठी मोहन खोचगे यांना पाच तर महालिंग स्वामी यांना चार मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी युवराज पाटील होते. साहाय्यक म्हणून ग्रामसेवक रोहिणी हावळ, तलाठी अविनाश कोंडिग्रेकर होते.  निवडणूक निकालानंतर फटाक्‍यांची आतषबाजी गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उज्वला दांडगे, वनिता साळोखे, प्रज्ञा कांबळे, रवींद्र कांबळे, भाऊसाहेब पाटील, महालिंग स्वामी, भिमाबाई कांबळे उपस्थित होते.


सरपंच शीला पाटील व उपसरपंच मोहन खोचगे यांचे फोटो पाठवले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget