येत्या चार ते पाच दिवसापासून सरपंच निवडी होणार! तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत सरपंचपद निवडीचा कार्यक्रम जाहीर.

 


पंढरपूर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत सरपंचपद निवड कार्यक्रम सोलापूर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे.



तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड ही ९,११व १३ फेब्रुवारी रोजी होणार असून त्यासाठी ४७ अध्यासी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आले असून यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नवयुवकांचा मोठा प्रभाव दिसत असला तरी गाव कारभारी होण्याची संधी किती जणांना मिळतेय याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


कासेगाव ,वाखरी,रोपळे,नारायण चिंचोली आदि मोठ मोठ्या आणि सत्तापालट ग्रामपंचातीची सरपंच निवड ही मोठ्या चुरशीची होणार आहे



लोकांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून जरी दिले असले,आरक्षण सोडतीमुळे जरी सरपंचपदाची संधी मिळाली असली,तरी सरपंचासह ग्रामप्रशासनावर माहिती अधिकारातून गावातील तरूण वर्गाची मोठी वचक राहणार आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget