विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा योग्य व अचुक




युनिट नं.2 करकंब कारखान्याच्या वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी


सोलापूर // प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार वजन काटे तपासणी भरारी पथकातील अधिकारी यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथील वजनकाट्याची अचानक तपासणी केली असता कोणतीही तफावत आढळून आली नसून सर्व ऊसवजनकाटे योग्य व अचुक असल्याचे आढळून आले आहे.


याबाबत अधिक माहीती की, 03 फेब्रुवारी,2021 रोजी सकाळी 11.50 वा.चे सुमारास जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसिलदार, पंढरपूर यांचे अधिपत्याखाली एस.एस.नाईक, पुरवठा अधिकारी,तहसिल कार्यालय,पंढरपूर, एस.व्ही.यादव, निरिक्षक वैधमापन शास्त्र, पंढरपूर, पी.आर.शिंदे, लेखा परिक्षक श्रेणी-1, सहकारी संस्था(साखर),सोलापूर, ए.डी. राजकर, पोलिस हवालदार, करकंब पोलिस स्टेशन,ऊस उत्पादक धनाजी लांडे,जळोली, दत्तात्रय भोसले, उंबरे(पागे) यांचे भरारी पथकाने अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथील सर्व ऊस वजनकाट्याची तपासणी केली. या पथकाने अगोदर ऊस उत्पादकांचे ऊसाने भरलेली वजन करून गव्हाणीकडे पाठविलेल्या परंतु रिकाम्या न झालेल्या वाहनांना परत बोलावून सदर वाहनांचे वाहनचालकां समक्ष परत वजन तपासणी करून कारखान्याने पूर्वीचे वजन करून नोंद केलेल्या वजनासोबत प्रत्यक्ष आलेले वजन तपासले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून वजन रास्त व योग्य असल्याचे आढळून आले आहेत.यावेळी भरारी पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून ऊस वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसल्याचे अहवालात नमुद केले आहे.


सदरप्रसंगी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक एस.आर.यादव, चिफ इंजिनिअर एन.एच. नायकोडे, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, शिफ्ट सुपरवायझर ए.ए.काळे, हेडक्लार्क एस.एच.मिसकर व वाहन मालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget