सोलापूर // प्रतिनिधी
आज दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी सोलापूरातील समाजकल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे सोलापूर शहर जिल्हयातील समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत महाराष्ट्र शासनाची अनुसुचित जाती कल्याण समितीची बैठक समिती प्रमुख तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये समाजकल्याण विभागातर्फे सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तथा विविध नगरपालिकांना अनुसुचित जातीच्या कल्याणाकरीता विविध योजना राबविण्यात येण्याकरीता निधी उपलब्ध केला जातो. त्या निधीची योग्यरितीने वापर केला जात आहे का ? याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये सफाई कामगारांकरीता राबविण्यात येणारी श्रमसाफल्य योजना तसेच अनुसुचित जातींतील आवासाकरीता असणारी रमाई आवास योजना तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच मागासवर्गीय महिलांच्या बचत गटाकरीता, गटई कामगारांसाठी असणाऱ्या योजनांसाठी खर्ची पडलेल्या निधीची माहिती या बैठकीमध्ये घेण्यात आली. तसेच काही योजनांसाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचे या बैठकीमध्ये ठरले आहे. तसेच येत्या काही दिवसात विविध आर्थिक महामंडळ, बार्टी तसेच जातपडताळणी विभागाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे निश्चित झाले. यावेळी श्री. कैलास आढे सहायक आयुक्त समाज कल्याण, श्रीमती छाया गाडेकर उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, श्री संदीप कारंजे नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका, श्री. श्रीराम पवार प्रकल्प संचालक नागरी समुदाय विकास प्रकल्प सोलापूर महानगरपालिका, श्री. शिवाजी भोसले जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा यांचे प्रतिनिधी, श्री संतोष जाधव- जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री.यु.जी. कुलकर्णी सायक प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, श्री रवींद्र राऊत जिल्हा माहिती अधिकारी, श्री.एम.एन. कांबळे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, श्री ए. एल. शिरसागर जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, श्री. नागनाथ पवार जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मकार व विकास महामंडळ व श्री. संजय हेमगड्डी, नगरसेवक श्री. चेतन नरोटे, श्री. प्रविण निकाळजे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, अनुराधा काटकर, श्री. अशोक जानराव, श्री. अशोक लांबतूरे, श्री. सायमन गट्टू, श्री. दिनेश म्हेत्रे, श्री. अंबादास करगुळे आदि. उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.