वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोना संसर्गाचा परत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. अशातच गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजना महाराष्ट्र सरकार करीत आहे. माहुर गडावरील दत्त शिखर संस्थान प्रशासनांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ता. २२ सोमवार पासुन शासनाच्या पुढील आदेशा पर्यंत भाविकांसाठी दारे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदीरातील पूजाविधी नियमितपणे सुरु राहणार असून, सामान्य भाविकांसाठी भगवंताचे दर्शन बंद राहणार आहे. दर वर्षी माघ. पौर्णिमा दत्त मंदिर वर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव च्या पाश्वभूमीवर ता २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणारी माघ. पौर्णिमा उत्सव यंदा रद्द करण्यात आली आहे. कोरोना महामारी मुळे कोणत्याही भाविक भक्तांना जनतेला तसेच महामारीच्या विरोधात लढणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला या रोगाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय दत्त शिखर मंडळाच्या सदस्यांनी एकमत करुन घेतला आहे.
या वर्षी माघ पौर्णिमा उत्सव अगदी साध्या पणाने मंदीर परीसरात पारंपरिक पध्दतीने साजरा होणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.