सोलापूर // प्रतिनिधी
गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाविरोधात सोलापुर जिल्ह्यात प्रभावी,शक्तीनिशी लढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा कोरोनाने जखडले आहे.पुढील उपचारासाठी त्यांना शहरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना पहिल्यांदा याची लागण झाली होती मात्र आज पुन्हा विषाणूने संसर्गित झाले आहेत.नागरिकांनी गाफील न राहता बाहेर जाताना मास्क व सामाजिक अंतर ठेवून कोरोनापासून बचाव करण्याचे भावनिक आवाहन त्यांनी आज यावेळी केले.डॉ.शंभरकर यांना २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाची लस देण्यात येणार होती.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.