पंढरपूर // पंढरपूर
महाराष्ट्र राज्यात नुकत्याच जवळपास 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत.त्यामुळे नुतन गावकारभाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या.
गाव हा देशाचा केंद्रबिंदू असून देशातील सर्वच ग्रामपंचायती विकास पूर्ण करण्याचा देशाचा प्रयत्न असून यासाठी ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विशेष निधी देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत विकास कार्यक्रमातून गावाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे.या दृष्टिकोनातून गावाचा विकास साधणारे आणि नेतृत्व करणारे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य हे तितकेच सक्षम होण्यासाठी त्यांना विविध विषयाचे ज्ञान, कौशल्य शासनाकडून देणे आवश्यक आहे.तसे कार्यक्रम ही महाराष्ट्र शासन राबवत आहे.
आज पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षण पुन्हा जाहीर करण्यात आले.
यामध्ये अजोती ग्रामपंचायत उपसरपंच पदी अमृता प्रशांत गुटाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित सरपंच सचिन देडगे,माजी उपसरपंच शिवाजी साळुंखे, सदस्य विजय अरकिले, राणी अविनाश कन्हेरकर, वर्षा राणी गुरूदास गुटाळ, सुरेखा हांडे, माजी सरपंच प्रताप गुटाळ, अण्णासाहेब पाटील, सुभाष साळुंखे, अमरजित पवार, पंकज कन्हेरकर, नानासाहेब थाटकर, राजेंद्र साळुंखे, प्रवीण साळुंखे आदी ग्रामस्थ उपथित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.