महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी प्रणिती शिंदे यांच्या निवडीबद्दल सोलापुर शहर युवक काँग्रेस वतीने जल्लोष




सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नाना पटोले कार्याध्यक्षपदी प्रणिती शिंदे व इतर पाच जणांची निवड झाली. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सोलापुर शहर युवक काँग्रेस वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशे वाजवून, फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.


यावेळी बोलताना अंबादास बाबा करगुळे म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी, व राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नाना पटोले व कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड केली. आमदार प्रणिती शिंदे हया महाराष्ट्राचे अभ्यासु, कर्तुत्ववान युवा नेतृत्व असुन त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाकडे युवक, युवतींचे पक्षाकडे ओढ़ा वाढेल, युवकांचे प्रश्न शासन दरभारी मांडतील, युवा धोरण राबविण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त युवा वर्गाला व सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस पक्षात सामावून घेण्याच्या प्रयत्न नूतन कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून होईल.


यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महिला काँग्रेस अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, युवराज जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, पंडित सातपुते, शौकत पठाण, रफीक इनामदार, मणिकसिंग मैनावाले, सुमन जाधव, प्रमिलाताई तुपलवंडे, संजय गायकवाड़, राहुल गोयल, यल्लाप्पा तुपदोळकर, मनोज कुलकर्णी, प्रकाश आसादे, राजेन्द्र शिरकुल, महेश लोंढे, संघमित्रा चौधरी, कमरुनिस्सा बागवान, सुभाष वाघमारे, उमर मुकेरी, नागेश म्याकल, शोभाताई बोबे, मनोज दरेकर, विश्वास गज्जम, श्रद्धा हुल्लेनवरू, प्रियंका डोंगरे, महेश कुंभार, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget