प्रा.संग्रामचव्हाण,जिल्हाध्यक्ष,सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेस
सोलापूर // प्रतिनिधी
नूतन प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचे व्यक्तिमत्व या दिलखुलास तसेच आक्रमक असून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र राज्यामध्ये उभारी देण्यासाठी नानासाहेब पटोले यांच्या रूपाने हुकमी एक्का बाहेर काढला असून राजकारणाच्या सारीपटावर हा हुकमी एक्का राज्याच्या राजकारणामध्ये बाजी मारून जाईल अशी सर्वत्र चर्चा आहे.
श्री. पटोले यांच्या रूपानं महाराष्ट्र काँग्रेस पक्षाला एक तरुण, तडफदार व लोकप्रिय असा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.नानासाहेब पटोले यांनी दोनच वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता.त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रमध्ये स्थापन झाल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने त्यांना थेट महाराष्ट्र विधान सभाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती भारतीय जनता पक्ष मधून खासदार म्हणून निवडून येऊन सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदी निर्णयाच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेल्या अनिष्ट,दीर्घकालीन परिणामांबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या व मागासवर्गीयांच्या हिताच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांचेवर उघड व धडक टीका करून भारतीय जनता पक्षाचा खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार म्हणून संपूर्ण देशात चर्चेला आले होते.
पंतप्रधान मोदींवर थेट टीका करणारे ते भारतीय जनता पक्षाचे पहिले खासदार होते.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वामध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला एका आक्रमक चेहऱ्याची गरज होती.पक्षाच्या तरुण नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाना पटोलेंसारख्या धडाडीच्या आणि आक्रमक नेतृत्वाची सातत्याने मागणी होत होती.नाना पटोलेंना आता संधी देण्यात आली असून काँग्रेसची राज्यातील पिछेहाट रोखण्यात ते निश्चित यशस्वी होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. यापूर्वी या पदाची जबाबदारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. नानासाहेब पटोले यांच्या या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या विशेषतः तरुण फळीमधे नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. या पदासाठी विजय वडेट्टीवार यांनीही मोठी ताकद लावली होती पण नाना पटोलेंनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी आमदार प्रणितीताई शिंदे यांची निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आमदार प्रणिती ताई शिंदे पश्चिम महाराष्ट्रा मधून एकमेव तरुण तडफदार,सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे सक्षम महिला नेतृत्व असून असून आपल्या आक्रमक कार्यशैलीने त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटविला आहे. त्यांनी त्यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जनसेवेचा वारसा अखंडितपणे चालू ठेवून संपूर्ण राज्यभर एक महिला आमदार कशा पद्धतीने काम करू शकते याचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून श्री नाना पटोले यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी व आमदार कु. प्रणितीताई शिंदे यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस कार्याध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक श्री प्रकाशराव घाले व पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.संदीप साठे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, प्रियांका वढेरा ,श्री राहुल गांधी व श्री. वेणुगोपाल, जनरल सेक्रेटरी यांचे आभार मानले व त्यांना त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
:- प्रा. संग्राम चव्हाण
जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.