उर्जा मंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते न पाळता घुमजाव केले. हे वीज बील माफ न केल्यास पुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाधक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिला आहे.
मोहोळ वीज मंडळाच्या कार्यालया समोर शुक्रवारी य महावितरण केंद्राच्या विरोधात "टाळा ठोको" व "हल्लाबोल आंदोलन" करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सामान्य वीज ग्राहक आणि शेतकर्यांना त्रास देण्याचे सरकारचे धोरण आहे. ७५ लाख जणांना कनेक्शन तोडण्याची नोटीस आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी १०० युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते तर माफ केले नाही उलट सरकारकडून लाईट बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. लॉकडाऊन मुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अजून सर्व काही सुरळीत झालेले नाही. त्यामुळे लाईट बिल एकदम भरणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने १०० युनिट वीज बिल माफ करावे व उर्वरित बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी, अशी आमची मागणी आहे, त्यासाठी हे आंदोलन राज्यात सर्वत्र सुरू आहे. एवढे करूनही राज्य सरकारने सक्तीची वीज बील वसुली सुरू ठेवल्यास यापुढे भाजप आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, बाळासाहेब पाटील, भाजयुमोचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, भाजप अनुसुचितजाती आघाडीचे नूतन प्रदेश सचिव संजीव खिलारे, लोकसेवक संजय क्षीरसागर, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश सोवनी,माजी तालुका अध्यक्ष संतोष नामदे, माजी शहराध्यक्ष अविनाश पांढरे, अरविंद माने, जगन्नाथ वसेकर, भाऊराव सोनटक्के, पैलवान भारत आवारे, विष्णुपंत चव्हाण, गणेश झाडे, सागर वाघमारे, गुरुराज तागडे, नूतन ग्रा.पं. सदस्य विकास वाघमारे, युवराज शिंदे, अमोल चोरगे, बंडोपंत ढेरे,दिनेश गडदे, सागर लेंगरे, अतिक मुजावर, पैलवान पंकज चव्हाण,आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी उद्योग आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष लिंगादेव निकम (कुरुल), यांचा सत्कार करण्यात आला.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.