सोलापूर // प्रतिनिधी
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर या कारखान्याच्या 2020-21 चा गळीत हंगाम सांगता समारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना प्रादुर्भाव संदर्भातील सर्व नियम व अटी पाळून संपन्न झाला यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याच्या गाळप हंगामाची माहिती देत असताना सांगितले की, श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मालक यांनी घालून दिलेल्या धोरणानुसार कारखान्याचा गाळप हंगाम संपन्न करीत असताना त्यांनी दिलेले गाळपाचे उद्दिष्ट चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले असून या हंगामात कारखान्यांनी 10,06,000 मे.टन गाळप करुन 11.41 टक्के साखर उतारा मिळवीत 11,13,000 इतके साखर उत्पादन केले आहे. यावेळी कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पांमधून ही 6.67 कोटी इतके युनिट वीज निर्माण करुन 3.62 कोटी इतके युनिट एम. एस. डी. सी. एल. ला विक्री केले आहेत. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातून कारखान्याने 81.57 लाख लिटर इतके उत्पादन केले असून आणखी को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्प साधारणपणे दोन महिने पुढे चालणार आहेत या हंगामात मदत केलेल्या तोडणी वाहतुक ठेकेदार मजूर आणि कामगारांचे आभार मानून कारखान्याचा हा हंगाम समाप्त झालेचे जाहीर केले.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार श्री.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की सोलापूर जिल्हातील सर्वच कारखाने सुमारे एक महिन्यापूर्वीच बंद झाले असून या हंगामामध्ये श्रध्देय श्री सुधाकरपंत परिचारकमालक यांनी 10,00,000 मे.टनाचे गाळप होईल असे कारखान्याच्या रोलर पूजनावेळी जाहीर केले होते. त्यानुसार कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, युनियन पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांनी विना थांबा यापूर्वीचे दैनंदिन गाळपाचे रेकॉर्ड मोडून 6700 सरासरी दैनिक गाळप करुन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने वेळोवेळी सहकार्य करुन हा हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. यापुढेही अशाच पध्दतीने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा शेतकरी कामगार यांच्या हितासाठी तत्पर असणार आहे. पाठीमागील काही वर्षापासून सातत्यपूर्ण वाढणारे साखरेचे उत्पादन व बाजारपेठेमध्ये असणारी साखरेची कमी मागणी यामुळे सद्य परिस्थितीत साखर व्यवसाय अडचणीत आहे. यावर मात करण्यासाठी आसवनी प्रकल्पामधून इथेनॉल उत्पादन करुन विक्री करणे आवश्यक आहे. त्यानुसार कारखान्याने याहीवर्षी सुमारे 41 लाख लिटर इतक्या इथेनॉलचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यापैकी आज सुमारे 25 लाख लिटर इथेनॉल विक्री केले आहे. पांडुरंग परिवारातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे एक महिना उशिरा पर्यंत त्यांचा ऊस राखून ठेवला त्याबद्दल आ.प्रशांतराव परिचारक यांनी त्यांचे मनस्वी आभार मानले. त्याच बरोबर तोडणी वाहतुकदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन यांनी सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर कारखाना चालत असून या हंगामात त्यांनी दिलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरभाऊ मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री हरिषदादा गायकवाड, श्री.शिवाजीराव साळुंखे, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.सुरेश आगावणे, श्री.बाळासो यलमार, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.महीबुब शेख, श्री.नामदेव झांबरे, श्री.दिनकरराव कवडे, श्री.आनंदराव आरकिले, श्री.परमेश्वर गणगे, श्री.नागन्नाथ शिंदे, सौ.संगॣता पोरे, सौ.पार्वती नरसाळे, सौ.सिंधू पवार, श्री.भिमराव फाटे, श्री.अरुण घोलप आदि उपस्थित होते.
:-
डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.