श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने संपन्न .


 

सोलापूर // प्रतिनिधी 

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची एकोणतिसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली या सभेचे नियोजन करताना सर्व गट ऑफिस तसेच सर्व सभासदांना झूम अथवा युटयुब आयडी द्वारे या सभेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले होते. अतिशय चोक व सुनियोजन पध्दतीने या सभेचे कामकाज पार पडले. सभेची सुरुवात कारखान्याचे सर्वेसर्वा श्रध्देय कै.सुधाकरपंत परिचारक यांना आदरांजली अर्पण करुन करण्यात आली . त्याच बरोबर देशांंमधील मृत पावलेले सर्व थोर व्यक्ती कारखान्याचे मृत्यू पावलेले सभासद यांना श्रध्दांजली अर्पण करणेत आली. कारखान्याची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन कोरोना संदर्भातील सर्व नियम व अटी पाळुन करण्यात आले होते.

तद्नंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत व विषय पत्रिकांचे वाचन केले सर्व विषयांस सभासदांनी एकमताने मंजुरी दिली कांही सभासदांनी पत्राद्वारे विचारणा करण्यात आलेल्या मुद्दयाचे सांगोपांग समर्पक उत्तर कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांतराव परिचारक यांनी केले त्याच बरोबर कारखान्याच्या पूर्ण कामकाजाचा आढावा सादर केला सभासद शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकडे ऊसाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन करावे व आपली आर्थिक उन्नती करावी अशी स्पष्टोक्ती यावेळी श्री प्रशांतराव परिचारक यांनी केली नुकत्याच संपन्न झालेल्या गाळप हंगामामध्ये विक्रमी दैनंदिन गाळप करुन हा हंगाम यशस्वीरित्या दहा लाखापेक्षा जास्त गाळप केल्याबद्दल सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक अधिकारी, कर्मचारी सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांचे आभार व्यक्त केले सध्याच्या परिस्थितीमध्ये साखर कारखानदारीसाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीकरिता अनुदान देऊन तसेच साखरेची एम.एस.पी. ठरविल्यामुळे कारखानदारीला थोडेफार जीवदान मिळाले आहे याकरिता देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी व श्री गडकरी साहेब यंाचे आभार व्यक्त केले यापुढेही सध्याची एफआरपी देण्याकरिता साखरेची एम.एस.पी 3500 रुपये प्रति क्विं. होणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत त्यांनी सूचित केले.

तसेच सर्व सभासद शेतकऱ्यांचे आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.वसंतनाना देशमुख यांनी केले . यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन यांनी सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर कारखाना चालत असून या हंगामात त्यांनी दिलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरभाऊ मोरे, श्री हरिषदादा गायकवाड, श्री.शिवाजीराव साळुंखे, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.सुरेश आगावणे, श्री.बाळासोा यलमार, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.महीबुब शेख, श्री.नामदेव झांबरे, श्री.दिनकरराव कवडे, श्री.आनंदराव आरकिले, श्री.परमेश्वर गणगे, श्री.नागन्नाथ शिंदे, सौ.संगॣता पोरे, सौ.पार्वती नरसाळे, सौ.सिंधू पवार, श्री.भिमराव फाटे, श्री.अरुण घोलप आदि उपस्थित होते.

:-  

डॉ.यशवंत कुलकर्णी

 कार्यकारी संचालक

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget