राज्यातील साखर कारखानदारी चुकींच्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे कामगार व शेतकऱ्यांची देणी जवळपास सर्व कारखानदारांकडुन राहिली आहेत. गाळपास आलेल्या ऊसबिलाची रक्कम अर्थात एफ.आर.पी. देण्यासाठी मोठ्या संकटांना सामोरे जावं लागत आहे. या संकटांच्या मालिकेमुळे ९९ टक्के कारखानदारांनी एफ.आर.पी. देखील पुर्ण केली नसताना भीमा वरील पहिल्या आर.आर.सी. कारवाईचा तिढा सुटला नसताना दुसरी कारवाई केली असुन केवळ हे शेतकऱ्यांचे मंदिर कसे बंद पडेल इतकाच खुनशी हेतु ठेवुन आर.आर.सी. ची कारवाई राजकिय द्वेषातुन केली असल्याचे रोखठोक प्रतिपादन भीमा चे चेअरमन माजी खा.धनंजय महाडिक यांनी केले.
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक प्रभाकर शिंदे, युवा नेते पवन महाडिक, संचालक प्रभाकर देशमुख, दादासाहेब शिंदे, गणपत पुदे, बापू जाधव, तुषार चव्हाण, सिद्राम मदने, अंकुश गवळी, राजेंद्र टेकळे, अनिल गवळी, रामहरी रणदिवे आदी मान्यवर सर्व उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.