खासगी बसेसच्या पुण्यासाठीच्या 30 हून अधिक फेर्या बंद.
विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नांदेडकडे जिल्ह्यातून ये-जा करणार्या एसटी महामंडळाच्या आठ फेर्या तर औरंगाबादकडे जाणार्या 23 फेर्या मंगळवारपासून (दि.16) ते 23 मार्च दरम्यान बंद राहणार असून पुण्याकडे जाणार्या खासगी बसेसच्याही 30 हून अधिक फेर्या बंद होणार आहेत.
दरम्यान, मुंबईकडे ये-जा करणारी खासगी बससेवा बंद केली आहे तर एसटी महामंडळाची एकही बससेवा नसल्याने बसमार्गे मुंबईचा प्रवास 23 मार्चपर्यंत पूर्णतः ठप्प होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढू लागल्याने त्यास रोख बसावा,जिल्ह्यात संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी पुणे, मुंबईची खासगी,तर नांदेड, औरंगाबादकडे ये-जा करणारी एटीच्या वाहतुकीस 23 मार्चपर्यंत प्रतिबंध केला आहे.नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहे.त्यामुळे तेथून ये-जा करणारी एसटीची सेवा 23 मार्चपर्यंत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय श्री.मुगळीकर यांनी घेतला.यामुळे नांदेडकडे जाणारी परभणी पूर्णा नांदेड या बसच्या फेर्या तसेच गंगाखेडहून नांदेडला जाणार्या व येणार्या एसटीच्या फेर्याही मंगळवारपासून (दि.16) ते 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
या शिवाय औरंगाबादला जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात दैनंदिन फेर्या होतात. त्यात गंगाखेडहून तीन, तर परभणीहून नुकत्याच तीन फेर्या सुरू केल्या होत्या.तसेच एक फेरी रेग्युलर सकाळी साडेपाच-सहा वाजता होती, पाथरीहून तीन फेर्या,सेलूहून दोन फेर्या, तर जिंतूरहून सर्वाधिक म्हणजे नऊ फेर्या,व मानवत येथून एक फेरी औरंगाबादसाठी होती.मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे या सर्व फेर्यांची ये-जा मंगळवारपासून (दि.16) ते 23 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात,असे आदेश श्री.मुगळीकर यांनी काढल्याने नांदेड व औरंगाबादकडे जाणारी एसटीची सेवा ठप्प होणार आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातून पुण्याकडे ये-जा करणार्या खासगी बसेसची संख्याही मोठी आहे.त्या तुलनेत एसटी महामंडळाच्या परभणीहून सकाळी दोन व सायंकाळी दोन या चारच फेर्या होतात.या शिवाय,जिंतूरहून सकाळी एक,सायंकाळी एक, सेलूतून सायंकाळी एकच, पाथरीहून सकाळ व सायंकाळी प्रत्येकी एक,तर गंगाखेडहून चार फेर्या व मानवतहून एक फेरी आहे.
खासगी बसेसच्या दररोज किमान 30 हून अधिक फेर्या पुण्यास होतात.खासगी बसेसच्या ही सेवा नांदेडहून परभणीमार्गे पुण्याकडे तसेच परभणी शहरातून पुण्याकडे जाणार्या खासगी बसेसचीही संख्या एसटी महामंडळाच्या तुलनेत अधिक आहेत.मात्र,खासगी सेवा मंगळवारपासून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून बंद केली आहे.
मुंबईकडे जाणारी एसटी महामंडळाची एकही बस जात नाही.तर खासगी एसटी बसेसच्या पाच फेर्या होतात.मात्र,त्या 23 पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.