(नितीन काळे यांनी चांगला कार्यक्रम घेतल्यामुळे त्यांच्यावरती सर्व स्तरातून कौतुक!)
सोलापूर // प्रतिनिधी
शिव सरपंच सेवा संघाच्यावतीने आज श्री क्षेत्रपंढरपूर येथे कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सर्व महिला भगिनींचा व त्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळून सोशल डिस्टंसिंग पाळून संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमासाठी शिव सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव विठ्ठल सरवदे साहेब त्याचप्रमाणे सौ जयश्री ताई दीपक शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी शिव सरपंच संघटनेचे संस्थापक श्री लक्ष्मणराव सरवदे बोलताना पुढे म्हणाले की, शिव सरपंच संघटेच्या माध्यमातून जो सामाजिक,सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी ज्या महिला कार्य करत असतात अशा व कोरोना काळात ज्या विविध क्षेत्रातून काम केले आहे यांना कोव्हीड योद्धा सन्मानपत्र व श्री संत पुरस्कार यावेळी कार्यक्रमातून सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे.
या कार्यक्रमावेळी शिवसरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणराव सरवदे,विठ्ठल सह.साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.युवराजदादा पाटील,
प्रदेश अध्यक्षा सौ.जयश्रीताई शुक्ला,नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,
सचिव विकास लक्ष्मण सरवदे, उपाध्यक्ष नेहा राऊत पाटील,कोषाध्यक्ष रामचंद्र सरवदे,दिपक शुक्ला,सुनील साळवी व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
:-
आज संत नगरीमध्ये सरपंच सेवा माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील गाव खेड्यापर्यंत सर्व योजना पोहोचवायचे असून महिला सशक्तिकरणाचे पुढचे पाऊल आम्हाला आता उचलायचे आहे नितीन काळे यांच्यामुळे हा कार्यक्रम खूपच चांगला झाला असून त्यांनी चांगले भरीव असे कार्य केले आहे.
-:सौ.जयश्रीताई शुक्ला
प्रदेश अध्यक्षा,शिवसरपंच सेवा संघटना

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.