सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे.

 



आमदार प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी


सोलापूर // प्रतिनिधी 

गेल्या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना चा प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे सोलापूर शहरात सुद्धा covid-19 रुग्णांचे प्रमाण वाढले होते त्यामुळे सोलापुरातील विविध हॉस्पिटल सोबत ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मध्ये सुद्धा कोव्हीड-19 सेंटरची स्थापना करण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हीड-19 सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णसंख्या झाल्यामुळे तेथे मुबलक बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील बंद असलेले ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील covid-19 सेंटर तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून ई एस आय व रेलवे हॉस्पिटल मधील बंद असलेल्या covid-19 सेंटर पुन्हा सुरू करून रुग्णाच्या उपचाराकरिता सोय करून देण्यात यावे. अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget