दलित महासंघाच्या पंढरपुर शहर युवा अध्यक्षपदी आदिनाथ शिंदे यांची निवड




पंढरपूर // प्रतिनिधी

दलित महासंघाच्या युवा आघाडी  पंढरपुर शहर अध्यक्षपदी आदिनाथ नामदेव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.  

दलित महासंघ हा महात्तमा ज्योतिबा फुले,छत्रपती राजश्री शाहु महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शाहिर आण्णा भाऊ साठे यांची विचारसरणी पुढे चालवत असून सर्व सामान्य गोरगरीब नागरीकांना न्याय देण्याचे काम करीत आहे.

आदिनाथ नामदेव शिंदे यांच्याकडून अनेक सामाजीक कार्य घडत असून गोरगरीब नागरिकांच्या आडचणीला धावत येत व सामाच्या वाचाराने त्यांच्या आडचणी सोडविणे अशाप्रकारे अनेक कार्य करत आहेत दलित महासंघाने याचिच दखल घेत आदिनाथ नामदेव शिंदे यांना पंढरपूर शहर युवा अध्यक्षपदी किशोर जाधव,कॉंग्रेस शहर अध्यक्ष गणेश माने,पंढरपुर ता.अध्यक्ष आमोल खिलारे,रमेश कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन एकमताने निवड करण्यात आली आहे.


यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष गणेश माने,किशोर जाधव,दलित महासंघाचे पंढरपुर ता.अध्यक्ष आमोल खिलारे, रमेश कांबळे, संदिप शिंदे,प्रकाश मोदी ईश्वर खंडेलवार ऋषिकेश अवघडे अक्षय कदम  योगेश सुरवसे व आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget