भाजपाकडून राम शिंदे यांच्या नावाची पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात चाचपणी

 



(पण मतदार संघातील मतदार बाहेरचा उमेदवार स्वीकारणार का?)


सोलापूर // प्रतिनिधी

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टी कडून आज अचानक पणे अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव समोर आले असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील संपूर्ण धनगर समाजाचे मतदानाचे प्राबल्य पाहता व व राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा व्होट बँक असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजाची सर्व मते पाहता राम शिंदे यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्चित झाले असल्याचे आत्ता सध्या तरी समजत आहे.



2014/ 2019 साली अनुक्रमे आमदार प्रशांतराव परिचारक व त्यांचे चुलते स्वर्गीय सुधाकरपंत मालक परिचारक यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टी कडून देण्यात आली होती पण दोन्ही वेळेस स्वर्गीय भारत नाना भालके यांनी त्यांचा चांगल्या मताधिक्याने पराभव केला आता स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मोठी शक्कल लढवली असून दोन्ही तालुक्यांमध्ये मोठी वोट बँक असलेल्या धनगर समाजाचे नेते माजी मंत्री राम शिंदे यांना मैदानात उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली असल्याचे समजत आहे.

पण भाजपाने जय राम शिंदे यांना उमेदवारी दिली तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याचे यावेळी बोलले जात आहे आगामी आठ दिवसाचा कालावधी हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मतदारांसाठी व तेथील इच्छुक उमेदवारासाठी  मोठा ठरणारा असल्याचे चित्र आता सध्या तरी निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचा भौगोलिक विचार करता पंढरपूर तालुक्यामधील बावीस गावांमध्ये व्यक्तिगत राजकारणाचा खूप मोठा प्रभाव असल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे एकीकडे पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे राजकीय घराणे म्हणून परिचारक करण्याकडे पाहिले जात असताना दुसरीकडे स्वर्गीय भलके यांचे सुद्धा काम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. स्व. भारत नाना भालके यांचे काम मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुद्धा भगीरथ दादा भालके यांना सहानुभूतीची लाट मिळण्याची दाट शक्यता आहे.


त्याचबरोबर राम शिंदे यांना जर पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उतरवले तर स्थानिक मतदारांना कितपत हा उमेदवार योग्य वाटेल त्याचप्रमाणे 2009 ची पुनरावृत्ती दाट शक्यता आहे. 2009 ला स्वर्गीय भारत नाना भालके यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव केला होता तसे न होता स्थानिक उमेदवार देणे सुद्धा फार गरजेचे असले सुद्धा यावेळी सर्व पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांतून बोलले जात आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget