सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील 22 गावे व मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये धनगर समाजाचे मोठे प्राबल्य असल्यामुळे आज पंढरपूर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील एका नवतरूण सामाजिक काम करणारे श्री संजय नागनाथ माने यांनी आज आपला यशवंत सेनेच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नसल्याचे यावेळी सर्व प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
संपूर्ण मंगळवेढा तालुक्यामध्ये धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व या समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धनगर समाजा मधील एका तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महाविकासआघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पुढे सर्वात मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे यावेळी बोलले जात आहे त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महा विकास आघाडी करून अजून कुणीही अर्ज भरला नसल्यामुळे व त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे या संजय माने यांनी अर्ज भरल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर शहर मंगळवेढा शहर या शहरांमध्ये सुद्धा मोठे मताधिक्य असल्यामुळे आज पर्यंत 2009 ते 2019 पर्यंत या समाजासाठी कुणीही काहीही केले नसून फक्त समाजाचा मतासाठी उपयोग करण्यात आला असल्याचे यावेळी यशवंत सेनेचे उमेदवार संजय नागनाथ माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
:-
संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघामध्ये आजपर्यंत सर्व धनदांडग्यांनी धनगर समाजाची मोठी फसवणूक केली आहे त्यासाठी मी यशवंत सेना बारा, बलुतेदार संघ व अठरापगड जाती यांच्या माध्यमातून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये १०३,००० इतकी संपूर्ण धनगर समाजाची मते आहेत ती सर्व मते मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.