सहाय्यक कामगार आयुक्त श्री.यलगुंडे यांच्यावर शिष्टभंगाची कारवाई करा.:- विष्णु कारमपुरी (महाराज)




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी मा . जिल्हाधिकारी श्री . मिलिंद शंभरकर यांना दिली आहे . 

           सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री यलगुंडे यांना शिस्तभंगाची कारवाई करावे अशा मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यात सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे साहेब यांनी बांधकाम कामगारांचे बोगस नोंदणी करुन शासनाचे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार व नुकसान केले आहे . आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात निष्क्रीय आहेत . म्हणून त्यांना त्वरीत निलंबित करुन बोगस बांधकाम कामगार नोंदणीचे चौकशी करा . अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटनानी आपल्याकडे केले आहेत . *म्हणून सदर बाबी आपण स्वतः आपल्या दालनात जानेवारी २०२१ पासून १५/३/२०२१ , २२/१/२०२१ व १८ / ३ / २०२ ९ अशा अनेक वेळा बैठका आयोजित केल्या आपल्या कार्यालयामार्फत लेखी पत्र देण्यात आले.* ही सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर श्री . निलेश यलगुंडे हे स्वतः उपस्थित राहिल नाहीत किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवुन दिले नाही म्हणजे श्री यलगुंडे यांना आपण बैठकीसाठी दिलेले निमंत्रण पत्राचे महत्त्व नाही आणि आपले आदेशाचे गांभीर्य नाही . म्हणूनच ते कोणत्याही बैठकीला येत नाही . यावरुन त्यांना त्यांच्या कर्तुत्वाचा व आपण दिलेले आदेशाचे पालन करायचे नाही असाच होतो त्यांनी बैठकीस न आलेल्या बैठकीसाठी आलेले इतर कामगार प्रतिनिधी व कामगार संघटना पदाधिकाऱ्यांचा अमुल्य वेळ वाया जातो . हि बाब लक्षात घ्यावे . 

           तरी माननीयांनी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे व त्यांच्या भ्रष्टाचारास सहकार्य करणारे सर्व अधिकारी यांना ताबडतोब निलंबित करुन बोगस बांधकाम कामगार नोंदणी भ्रष्टाचारांची चौकशी करावे ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले . 

            मा . जिल्हाधिकारी यांना विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दशरथ नंदाल , विठ्ठल कु -हाडकर , पप्पु शेख , श्रीनिवास बोगा , प्रशांत जक्का , प्रसाद जगताप , श्रीनिवास यनगंटी , रेखा आडकी , अर्चना सग्गम , अनिता बटगिरी , संध्याराणी कुऱ्हाडकर आदिचा समावेश होता .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget