सहकार शिरोमणी कारखान्याची 29 वी वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभा संपन्न




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

चंद्रभागानगर, भाळवणी, कोरोना विषाणुच्या महामारीमुळे राज्य शासनाचे आदेशोनुसार सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2019-20 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची 29 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झुम अॅपवरुन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपन्न झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना ऑनलाईन हजर असलेल्या सभासदांनी मंजुरी दिली.


प्रथम श्री.विट्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे व उपस्थित संचालकांचे हस्ते करण्यात आले. तदनंतर व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी श्रध्दांजली ठराव मांडुन अहवाल सालातील दिवंगत थोर व्यक्ती,कारखान्याचे सभासद व कामगार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 


यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले,संचालक मोहन नागटिळक,गोरख जाधव,बाळासाहेब कौलगे,भारत कोळेकर, दिनकर कदम,दिनकर चव्हाण,तानाजी सरदार,विलास जगदाळे,सुधाकर कवडे,योगेश ताड,इब्राहिम मुजावर,नागेश फाटे,अरुण बागल,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे,डेप्यु.जनरल मॕनेजर कैलास कदम,यांची उपस्थिती होती तसेच ऑनलाईन 225 सभासदांनी सदर सभेमध्ये सहभाग घेतला. 


सदर प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी महाराष्ट्रासह संपुर्ण देशावर कोरोनाचे संकट आल्यामुळे प्रथमच अशाप्रकारे ऑनलाईन सभा घेण्यात येत असल्याचे सांगीतले. पुढे बोलताना काळे म्हणाले मागील गळीत हंगाम दुष्काळी परिस्थिती व आर्थिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आला. सध्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढत आहे. नुकताच संपलेला गळीत हंगाम 2020-21 चालु करणेसाठी आलेल्या अनेक अडचणीवर मात करुन ऊस गळीत हंगाम,डिस्लरी व सहवीज निर्मिती प्रकल्प आपणा सर्वांच्या सहकार्याने चालु केला असल्याचे सांगून अहवाल सालातील कामकाजाची व विविध योजनांची माहिती दिली. केंद्र व राज्य शासनाने साखरेचा भाव 3100 केला मात्र शासनाच्या रिलिज कोठयाप्रमाणे टेंडर पध्दतीने साखर उचलण्यास व्यापाज्यांची उदासिनता त्यामुळे साखरेस अपेक्षित दर मिळत नाही. साखर साठयावरील माल तारणावरील कर्जाच्या व्याजाचा बोजा, बँकांचे  धोरण अशा अनेक कारणामुळे साखर उद्योग अडचणीत आला असून बँकांकडून कर्ज उपलब्ध होणेस अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गळीत हंगाम 2020-21 मध्ये अपेक्षित गाळपाचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. परिणामी को-जनरेशन प्रकल्पातून अपेक्षित वीज विक्री झाली नाही. सध्या राज्यातील सर्वच साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. 


स्व.दादांनी शेतकऱ्यांच्या  ऊसाला चांगला भाव मिळावा, त्यांचे कष्ट वाया जावू नये. त्यांनी केलेल्या कष्टाचा व गाळलेल्या घामाचा योग्य दाम त्यांना मिळावा म्हणून सहकार शिरोमणी साखर कारखान्याची उभारणी केली असून या पुर्वी सभासदांना एफ.आर.पी.पेक्षा जादा दर दिला असल्याचे सांगीतले. सध्या आपला कारखाना आर्थिक अडचणीत आहे. 31 डिसेंबर पर्यंतचे सर्व ऊस बीले देण्यात आली असून उर्वरीत बीले देण्यासाठी आम्ही संचालक मंडळ प्रयत्न करीत आहोत. निधि उपलब्ध झाल्यावर लगेच उर्वरीत बिलेही देण्यात येणार आहेत. 


पुढील गळीत हंगाम 2021-22 मध्ये 6 लाख मे.टन.गळीताचे उद्दीष्ट असून,डिस्टीलरी मधुन 75 लाख लिटर उत्पादन व को-जनरेशन प्रकल्पातून 3.50 कोटी युनिट एक्सपोर्ट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. साखरेच्या उत्पादनापासून अंदाजे रु.195 कोटी,डिस्टीलरी उत्पादनातून अंदाजे रु.33 कोटी 75 लाख व सहवीज निर्मिती प्रकल्पातून अंदाजे रु.25 कोटी 83 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. परंतू यासाठी आपण आपला नोंदलेला संपुर्ण ऊस सहकार शिरोमणी कारखान्यास देण्याची जबाबदारी पार पाडली तरच हे उद्दिष्ट पुर्ण शक्य होवुन,आपणा सर्वांचे एफआरपी प्रमाणे ऊस दर तसेच ऊस तोडणी वाहतुक पेमेंट,कामगार पगार वेळेत देता येणार आहेत. त्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी आपला संपुर्ण नोंदलेला ऊस सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देवुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

आपल्या सहकार शिरोमणी साखर कारखान्यास माजी कृषीमंत्री खासदार मा.श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरेसाहेब,उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवारसाहेब, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीससाहेब तसेच राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री.बाळासाहेब पाटील आदी मंत्री महोदयांचे वेळोवेळी मोलांचे सहकार्य लाभले आहे असेही श्री.कल्याणराव काळे यांनी यावेळी सांगीतले. 

गुढी पाडवा सणासाठी 5 एप्रिल पासुन साखर वाटप

कारखान्याचेवतीने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना प्रतीवर्षीप्रमाणे गुढी पाडव्यानिमित्त 5 एप्रिल पासुन सवलतीच्या दरामध्ये 25 किलो साखरेचे वाटप कारखाना कार्यस्थळावर व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्रातुन केली जाणार असल्याचे श्री.कल्याणराव काळे यांनी यावेळी जाहीर केले. 

अध्यक्षांच्या परवानगीने प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी विषय पत्रिकेतील विषय वाचन केले. त्यास ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. उपस्थितांचे स्वागत कारखान्याचे संचालक भारत कोळेकर यांनी केले तर आभार संचालक योगेश ताड यांनी मानले. सुत्रसंचालन समाधान काळेसर यांनी केले तर ऑनलाईन सभेचे कामकाज मे.अ विश,पुणे या एजन्सीचे मार्फत करण्यात आले. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget