28 तारखेच्या बैठकीकडे लागले संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष!



252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पार्टीने अद्यापही आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही नुसतेच बैठकांचे सत्र पंढरपूर मध्ये सुरू आहे याबाबतीत आम्ही भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांना छेडले असता त्यांनी दिनांक 28 मार्च 2021 होळी सणा दिवशी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ याबाबत बैठक होणार असून या बैठकीत सर्वतोपरी निर्णय होऊन उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत घोषणा होणार असल्याचे यावेळी सांगितले.

यासाठी आजपर्यंत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून प्रथमता उद्योगपती दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान दादा अवताडे यांचे नाव पुढे येत होते त्यानंतर ते नाव मागे पडत प्रशांतराव परिचारक यांचे नाव पुढे आले त्याचबरोबर उद्योगपती अभिजित पाटील व स्वेरी कॉलेजचे डॉ. बीपी रोंगेसर, यांचीसुद्धा पक्षाने संपूर्णपणे चाचपणी केली मध्येच धनगर समाजाच्या मताधिक्य साठी अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री राम शिंदे यांचे सुद्धा नाव पूर्ण पणे समोर येत होते पण पक्षाच्या धैर्यधोरणानुसार भारतीय जनता पार्टीने कुणालाही उमेदवारी फायनल अद्यापही केली नसल्याचे श्रीकांत दादा देशमुख यांनी सांगितले दिनांक 28 मार्च रोजी रविवारी उमेदवारी फायनल होणार असल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या समर्थक व कार्यकर्त्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे लागली आहे.



याच बरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी एक चाणाक्ष व ताकतवान असा उमेदवार देणे.  हे पक्षाचे धोरण असल्याचे काही ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.


आता 28 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतसाठी लढत ही दुरंगी का चौरंगी हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget