मांजरखिंड येथे बोलेरो पिकअप गाडीवर राधानगरी पोलिसांचा छापा
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राधानगरी ते मुदाळ राज्यमार्गावरून गोवा बनावटीची दारु महाराष्ट्र शासनाचा कर चुकवुन अवैधरित्या शनिवारी ( ता. २७) दुपारी बाराच्या सुमारास बोलेरो पिकअप गाडीतुन( क्र. एमएच ०९ बीसी ७०७४) विदेशी दारूंच्या बॉक्सची बेकायदा वाहतूक केली जात होती. याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदशनाखाली पो. नाईक कृष्णात यादव, पोलीस हवालदार के.डी लोकरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल केने, प्रवीण पाटील यांच्या पथकाने सदर गाडी पकडली. सदर गुन्ह्यांमध्ये १,२३,२४० रुपयाची गोवा बनावटीची दारू व २,१०,००० रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दारू वाहतूक करणाऱ्या राजेंंद्र मारुती करमरे व.व.३५ रा.१२५पाटील गल्ली सोमलींग मंदीर माद्याळ कसबा नुल ता.गडहिंग्लज जि.कोल्हापुर याचेविरुद्ध अवैध दारू वाहतूक प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.गुरव हे करत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.