पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात सर्वात लोकप्रिय नेते म्हणून सचिन शिंदे पाटील यांना सर्वाधिक पसंती!




पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुक जाहीर होऊन बराच कालावधी लोटला परंतु अद्यापही कोणत्याच पक्षाने आपला अधिकृतपणे उमेदवार जाहीर केला नाही यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सचिन शिंदे-पाटील यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांनाच ललकारले आहे


सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक होतकरू मुलगा म्हणून सचिन शिंदे-पाटील यांची ओळख आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी त्यांनी सर्वतोपरीने सोडवले आहेत व सोडवत आहेत सचिन पाटील यांनी या सर्व समाज घटकातील शेतकरी बांधवांना व गोरगरीब सर्व सामान्यांना जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा पावलोपावली शेतकरी बंधुंना साथ दिली व त्यांच्या पाठीमागे थाम पणे उभा राहिले म्हणूनच "आता माघार नाही" असे म्हणत सचिन शिंदे-पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



आलीकडेच राज्य सरकारने लॉडाऊन जाहीर केला होता पंढरपुर शहरातील गोरगरीब कष्टकरी रस्त्यावरील माळा-फुले,कुंकु बुक्का,चिवडाप्रासाद विकणा-या छोटे-मोटे व्यापा-यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई देऊनच शासनाने लॉकडाऊन करावा अशी महत्त्वाची भुमिका सचिन शिंदे-पाटील यांनी याप्रसंगी घेतली आहे. 

 

रस्त्यावरील माळा-फुले,कुंकु बुक्का,चिवडाप्रासाद विकणा-या छोटे-मोटे व्यापा-यांना त्यांच्या ह्या मुलभुत आडचणी सोडविण्यासाठी सचिन शिंदे-पाटील यांनी आवाज उठविला व त्यांना आधार देत आपली कोणतीही आडचण आसूद्या मी सदैव आपल्या सोबत राहील असा विश्वास सचिन शिंदे-पाटील यांनी गोरगरीब व्यापा-यांना दिला.कोण कोणत्या पक्षातून उभे राहणार हे येत्या दोन ते तीन दिवसात चित्र स्पष्ट होईलच


पंढरपुर मंगळवेढा या मतदारसंघात गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये गोरगरीब जनतेला विकासाचे आमिष दाखवत मतं मिळवली व विकास तरी काहीच केला नाही दोन्ही तालुक्यातील जनतेला फक्त विकास करतो  तुमचे प्रश्न सोडवतो असे सांगत त्यांनी आतापर्यंत गोरगरीब जनतेची पळून केली आहे या मतदारसंघातील जनता सुज्ञ असून येणा-या मतदानादिवशी आपला हाक्क बजावणार तर आहेच परंतु योग्य उमेदवाराला ही साथ देणार आहे असा माझा विश्वास आहे असे यावेळी सचिन शिंदे-पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget