सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपुर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होऊन दोन ते तीन दिवस झाले अजूनही कोणत्याच पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले नाहीत खरे चित्र हे 30 मार्च नंतरच स्पष्ट होणार असले तरी कल्याणराव काळे यांनी समर्थक कार्यकर्त्यांना कोणाचा प्रचार करायचा याचा अद्यापही आदेश दिले नसल्यामुळे त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कल्याणराव काळे हे स्व.भारत नाना भालके यांचे निकटचे संबंध होते. स्व भारत नानांच्या दोन्ही निवडणुकीमध्ये कल्याणरावांनी स्व.भारतनाना भालके यांना चांगल्या पद्धतीने व चांगली साथ दिली होती.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी, खर्डी येथील श्री सिताराम कारखाना तिन्ही कारखान्याच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये कल्याणराव काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना म्हणजे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा "राजवाडा" गणला जातो. पण मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी सतत पडणारा दुष्काळ यामुळे कारखानदारी पुढे अनेक मोठे प्रश्न उभे राहिले होते. यावेळी स्व. भारत (नाना) भालके व कल्याणराव काळे यांनी सामोपचाराने एकत्र येत हे सर्व प्रश्न सोडवले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामधील सभासद व कामगार हा आपले घरातील सदस्य आहे. याप्रमाणे सर्व कामगारांचे व सभासदांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यामध्ये या दोन्ही नेत्यांचा हातखंडा होता. श्री कल्याणराव काळे यांनी मागील बऱ्याच कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्व. भारत नाना भालके यांना व संपूर्ण भालके परिवाराला, संपूर्णपणे साथ दिली होती 2009 व 2014 या सर्वच निवडणुकांमध्ये कल्याणरावांनी स्व.भारत (नाना) भालके यांना खंबीरपणे साथ देऊन महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे कल्याणरावांनी भारतीय जनता पार्टीचे 'कमळ'हातात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हेसुद्धा होते. त्यानंतर त्यांनी संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच काम करण्यास सुरुवात केली होती, पण २०२० चा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होताना कारखान्यांना खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले, त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्व गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचा ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून नावाजलेला सहकार शिरोमणी (चंद्रभागा) कारखाना खूपच मोठ्या आर्थिक संकटांमध्ये सापडला यावेळी स्वर्गीय भारत नाना भालके यांनी आपले पक्ष प्रेम बाजूला ठेवून कल्याणरावांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर सहकार शिरोमणी (चंद्रभागा) साखर कारखाना चांगल्या पद्धतीने गाळप करू लागला. आता त्या केलेल्या मदतीची परतफेड करण्याची वेळ कल्याणरावांवर आले असून स्वर्गीय भारत नाना भालके यांनी केलेल्या वेळोवेळी मदतीची परतफेड कल्याणराव करणार का?
का? भारतीय जनता पार्टी सांगेल ते ऐकून पक्षाच्या धैर्य धोरणाप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहणार हे आगामी काळात सर्वांना कळेल. याच अनुषंगाने कल्याणरावांची भूमिकासुद्धा निर्णायक व तेवढीच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा संपूर्ण पंढरपूर तालुक्यात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.