राज्यसरकारला पत्रकारांचा विसर यशवंत पवार




सोलापूर // प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समिती गेली अनेक वर्षापासून पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांवर दाखल असलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्र ला पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यासह कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पन्नास लाख रुपये मदत व शासकीय सेवेत सामावून घेणे राज्यातील युट्युब चॅनल व वेब पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे इत्यादी पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे वारंवार आंदोलने उपोषणे निवेदने तसेच पत्रव्यवहार करत असून या तीन चाकी सरकार ला पत्रकारांच्या योगदानाचा विसरू पडलेला असून हे सरकार पत्रकारांच्या बाबतीत कमालीचे उदासीन असल्याची जहरी टीका पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकार वर केली असून पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्रलालय समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंढरपूर येथे आले होते

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा फेटा व पुष्पहार घालून दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार राजाभाऊ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे पंढरपूर शहर अध्यक्ष यशवंत कुंभार चैतन्य उत्पात, विनोद पोतदार, बाहुबली जैन, विश्वास पाटील राजेंद्र काळे, अण्णा धोत्रे आदम बागवान बाबा काशीद रवी शेवडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget