पोटनिवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधनीला सुरूवात! कोणत्याही पक्षाने उमेदवार स्पष्ट न केल्याने मतदारांमध्ये उत्सुकता!

 



ज्या अर्थी सर्व इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. त्या आरती सर्वजण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून उभारणीच्या प्रत्यक्ष तयारीत जरी दिसत असले तरी महाविकास आघाडी कडून कोणाला एकाला तरी उमेदवार देणार असून त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कडून एक जणांना उमेदवारी मिळू शकते त्यामुळे जर जे इच्छुक पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे इथे जर एकाला डावलून जर दुसऱ्याला संधी दिली तर शंभर टक्के बंडखोरी होण्याची शक्यता आहे त्याच प्रमाणे आ. प्रशांत परिचारक, तसेच दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व कै.भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथदादा भालके यांच्यातच खरी लढाई होण्याची दाट शक्यता असून फक्त परिचारक परिवाराकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि ते कितपत भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी यशस्वी होतात हे येत्या सोमवार पर्यंत स्पष्ट होईल त्याच प्रमाणे शिवसेना नेत्या सौ.शैलाताई गोडसे यांनीही काही वर्तमानपत्रांना मुलाखती देताना असे सांगितले आहे की, मी उमेदवारी पक्षाकडे मागितले असून 2019 साली आघाडी व युती वेगवेगळे लढले होते त्यानंतरच्या दीड वर्षाच्या काळामध्ये पुलाकडून बरेच पाणी वाहून गेले असून आता सौ.शैलाताई गोडसे यांनी पक्षाकडे आग्रही मागणी धरल्याची सुद्धा त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे.



त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या पंढरपूर-मंगळवेढयांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्यासाठी तयारी केली असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक 21 मार्च रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत असून त्या दिवशी ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्वात जास्त धनगर समाज असल्यामुळे या समाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी पंढरपूर येथील होळकर वाड्यामध्ये बैठक घेऊन आपल्या समाजाचा उमेदवार उभा करायचा अशी आग्रही भूमिका घेतली होती धनगर समाजाचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मा. महादेवजी जानकर व गोपीचंद पडळकर त्याचप्रमाणे इतर दोन तालुक्यातील काही नेते मंडळी सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये बैठक घेऊन कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का स्वतंत्र उमेदवार उभा करायचा याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget