गॅस दरवाढ विरोधात कामगार सेनेचे निषेध आंदोलन




सोलापूर // प्रतिनिधी 

केंद्रातील मोदी सरकारने गरीबांसाठी अत्यावश्यक असलेला गॅसचा दर बारंबार वाड केल्याच्या निषेधार्थ शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सनच्या वतीने गॅस शेकडी व चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदविला . 

           केंद्रातील गरीब नरेंद्र मादीच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपा सरकार व कामगारांचे विकास करतो म्हणुन सत्तेवर आले आणि गरीब व कामगारांना संपविण्यासाठीच विरोधी कायदे आणले आहेत . इतकेच नव्हे तर गरीबांना अत्यावश्यक आणि रोज लागणारे गॅसचे दर वारंवार वाढ करून गगणाला विडविले आहे . त्यामुळे गरीबांचे जगणेच मुश्किल झाले म्हणुन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गैस शेकडीवर लाकडाने आणि कचऱ्याने स्वयंपाक बनवुन मोदी सरकारचे निषेध नोंदविले यावेळी कामगार बंधु - भगिनींनी गॅस दर बाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो , गरीबांना उपाशी मारणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो , मोदी सरकार हाय - हाय , भाजप सरकार हाय - हाय , कामगार एकजुटीचा विजय , असो , शिवसेना प्रमुख जिदाबाद , उध्दव ठाकरे जिंदाबाद असे घोषणा दिले.

         महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या मोदी सरकारच्या विरोधात निषेध करतांना गौरय्या जल्ला , शोभा पोला , फरिदा हरकारे , मिराबाई लच्छवाले , अंबुबाई पैटा , रमाबाई पंदिला , विठ्ठल कुऱ्हाडकर, शिवा ढोकळे , यलव्वा पेंटा , प्रशांत जक्का , लक्ष्मीबाई ईमा , श्रीनिवास यनगंटी , रेखा आडकी , श्रीनिवास बोगा , संध्याराणी कु-हाडकर , अनिता बटगिरी, पप्पू शेख,आदि सामील झाले .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget