सोलापूर // प्रतिनिधी
प्रतिनिधी पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी पदाचा प्रशांत देशमुख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरकोली गणातून निवडून आलेल्या सौ राजश्रीताई पंडीतराव भोसले यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती सदस्याची विशेष सभा पार पडली.
उपसभापती प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.या रिक्त जागेसाठी बुधवारी पंजायत समितीच्या सभागृहात सदस्यांची बैठक झाली. मध्ये राजश्रीताई भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.भोसलेे या स्व.भारत नाना भालके यांचे गाव असलेल्या या सरकोली पंचायत समिती गनातून मोठया मताधिक्याने निवडून आल्या आहेत. उच्चशिक्षित असलेल्या राजेश्री पंडीत भोसले यांनी यापूर्वी विठ्ठलचे संचालक व बाजार समितीचे उपसभापती म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी पार पडली आहे.सुरवातीला तीन वर्षे अरूण घोलप यांनी उपसभापती म्हणून काम केले. त्यानंतर कासेगाव येथील प्रशांत देशमुख यांना एक वर्षासाठी संधी मिळाली होती. त्यानंतर आता उर्वरित एक वर्षासाठी राजश्रीताई भोसले यांनी उपसभापतीपदाची संधी देण्यात आली आहे.
नूतन उपसभापती या तालुक्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून नाव असलेले पंडितराव भोसले यांच्या पत्नी आहेत. त्यांना यापूर्वीही मार्केट कमिटीचे उपसभापती पद देण्यात आले होते,त्यानंतर आताही त्यांना ही पद मिळाल्यामुळे परिचारक गट आणखी मजबूत होण्यासाठी मोठा फायदा होणार आहे ,
मागील जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आ भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल चे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांना सरकोली गटातून वसंतराव देशमुख यांचेकडून जो पराभव झाला यामध्ये याच भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे भोसले यांना देण्यात आलेले हे पद परिचारक यांच्या राजकीय दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
उपसभापती पदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व सदस्य व अधिकार्यांचे आभार व्यक्त केले. आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. आता पर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आ. प्रशांत परिचारक व ज्येष्ठ नेते मंडळींनी विश्वास दाखवून माझी उपसभापती म्हणून निवड केली आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याचे सांगत शिक्षण,रस्ते आणि पाणी या मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे नुतन उपसभापती राजेश्री भोसले यांनी सांगितले.
यावेळी सभापती अर्चना व्हरगर, माजी सभापती दिनकर नाईकनवरे, राजेंद्र पाटील, माजी उपसभापती अरूण पाटील, प्रशांत देशमुख, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, सदस्य संभाजी शिंदे, पल्लवी यलमर, अर्चना पाटोळे,धोंडीराम मोटे,सत्यवान देवकुळे, उमा बंगाळे आदी उपस्थित होते.
निवडी नंतर तहसीलदार बल्हेकर यांच्यहस्ते नुतन उपसभापती भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणूक सहाय्यक अधिकारी संतोष मोरे यांनी काम पाहिले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, खर्डी चे माजी उपसरपंच प्रणव परिचारक,बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके, यांच्या सह मोठ्या संख्येने आ. प्रशांत परिचारक गटातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.