कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आले असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीला अजून बऱ्याच महिन्यांचा कालावधी आहे. सध्या विधानसभा पोट निवडणूकी बाबत रणधुमाळी सुरू होणार असून परंतु याच रणधुमाळीत कारखान्याच्या निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व पंढरपुर तालुक्याचे लक्ष पोटनिवडणुकी ऐवजी आता श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात याबाबत घमासान चर्चा व बैठकांचे सत्र ही सुरू झाले असून. यामुळे कारखान्याकडे असलेली शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले, कामगारांच्या थकीत पगारी असे एकूण ७० कोटींच्या आसपास थकबाकी देणी अदा करण्याबाबत कारखान्यास आपण तात्काळ आदेश काढावेत याबाबतचे पत्र कारखान्याचे जेष्ठ संचालक तसेच स्व. औदूंबरआण्णा पाटील यांचे नातू मा.युवराज पाटील यांच्याकडून साखर आयुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठल सह.साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून त्याचा हा पहिला टप्पा असल्याचे सांगितले जात आहे.
विठ्ठल सह.साखर कारखाना हा पंढरपुर तालूक्यातील सर्व गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांच्या राजवाडा आहे परंतु या राजवाड्याला सध्या मोठी घरघर लागली आहे. त्यामुळेच अनेक महिने चालणारा हा कारखाना मागील काही गळीत हंगामाला बंद होता तर या गळीत हंगामाला पूर्ण क्षमतेने चालला नाही. शेतकऱ्यांनीही ऊस दरामुळे कारखान्याला ऊस देण्यामध्ये फारसा रस दाखवला नाही.त्यामुळे दि.१५ फेब्रुवारी ला कारखाना बंद पडला.
विधानसभा पोट निवडणुकीनंतर कारखान्याची निवडणूक पार पडणार असून.स्व. आ. भारत भालके यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे त्यामुळे तालुका, जिल्हा व संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मध्यंतरी विधानसभा पोट निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अचानक खांदेपालट झाली.परंतु यामुळे पक्षातच मोठा भूकंप झाला.पक्षाला पडत्या काळात उभारी देणारे सर्वच निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये काही जण पक्षाला वेठीस धरत असल्याचा दावा करत आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे,आम्ही शेवट पर्यंत पवार साहेबांच्या सोबत राहणार आहोत,आम्हाला विनाकारण त्रास दिला तर तो सहन केला जाणार नाही असे सांगत आता माझे वय पन्नाशीच्या पुढे गेले आहे,कुठवर आम्ही थांबायचे,आता माघार नाही असे सांगत कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी रणसिंग फुंकले व कारखान्याची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पाटलांनी केली.तेव्हा पासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची बिले नियमानुसार शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास आल्या पासून १४ दिवसाच्या देणे बंधनकारक आहे.परंतु कारखान्याने सन २०२०-२१ मध्ये ३०३५४७ गळीत केले असून साखटपोती २६७२२५ क्विंटल साखर उत्पादन केली आहे. कारखाना दि.१५ फेब्रुवारी रोजी बंद झाला. तरीही कारखाने दि.२१ डिसेंबर ते दि.१५ फेब्रुवारी पर्यंत ची ३९ कोटी रुपयांची उसाची बिले शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत दिलेली नाहीत.शेतकऱ्यांना बिले देण्यासाठी अंदाजे २ लाख २५ हजार क्विंटलचे आसपास साखर विक्री केली असूनही सदरची उसबिले कारखान्याने दिलेली नाहीत. तसेच मागील दोन वर्षापासून चे ऊस तोडणी वाहतुकीचे ८ कोटी व चालू वर्षी चे ४ कोटी ५० लाख असे एकूण १२ कोटी ५० लाखांचे पेमेंट अद्यापही केलेले नाही. कामगारांचाही १४ महिन्याचा पगार तसेच २०१४ पासून फरकाची रक्कम, हंगामी कामगारांचा रीटेन्शन तसेच सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे फायनल पेमेंट असे एकूण अंदाजे १८ कोटी रुपयांच्या आसपास देने बऱ्याच दिवसापासून थकीत आहेत. त्यामुळे वरील प्रमाणे शेतकऱ्यांची ऊस बिले, ऊस तोडणी वाहतूक पेमेंट व कामगारांची थकीत पेमेंट असे एकूण ७० कोटी रुपयांच्या आसपास सर्व थकीत देणी तात्काळ अदा करण्यास कारखान्यास आपण आदेश करावा असे पत्र संचालक युवराज विलासराव पाटील यांनी पुणे साखर आयुक्त यांना दि.३ मार्च रोजी दिले आहे.
या पत्रामुळे कारखाना निवडणूकीच्या रणधुमाळीचा हा पहिला टप्पा सुरु झाला असल्याची चर्चा होत असून युवराजदादा पाटील यांनी दिलेले पत्र सोशल मीडियावर सर्वत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे कामगार, सभासदांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या विधानसभा पोट निवडणूकी ऐवजी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा जास्त होत आहे.
कारण काही झाले तरी आपला शेतक-यांचा 'राजवाडा' पुन्हा मानाने डौलला पाहिजे व पुन्हा नव्याने शेतकरी,कामगार सभासद सर्व ऊस उत्पादक चांगले दिवस आले पाहिजे ही चर्चा आता पंढरपुर तालूक्यातील सर्वांच्याच तोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.