महानगरपालिकेचा करोडो रुपयाचा घरफाळा अनेक धनदांडग्यानी बुडवला आहे:- मा.खा. धनंजय महाडिक




या सर्व लुटारूंन विरोधात आम्ही कायद्याची रस्त्यावरची व सर्व प्रकारची लढाई लढण्यास तयार आहोत


वृत्तसंस्था // प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेने नुकतीच अनावश्यक व गरज नसताना केवळ महानगरपालिकेची आर्थिक तुट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर घरफाळा व पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित करून अनाठाई करवाढ करून जनतेवर जजीय कर लादला आहे. याबाबत आम्ही सर्वप्रथम याचा निषेध करतो.


महापालिकेने आर्थिक तूट भरून काढण्याकरिता घरफाळा वाढ व पाणीपट्टी वाढ करण्याशिवाय अन्य गत्यंतर नाही असा बनाव केल्याचे दिसून येत आहे. मुळात कोल्हापूर महापालिकेने शहर हद्दीतील सर्व मिळकतीची खानेसुमारी करण्याकरिता एक स्वतन्त्र एजन्सी कोट्यावधी रुपयांचे शुल्क फी भरून नेमली होती. सदरच्या कंपनीने कोणत्याही अहवाल योग्य वस्तुनिष्ठ दिला नाही. उलट पक्षी मिळकत धारकांशी संगणमत करून त्यांच्या अर्थानुरूप मिळकतींची खोटी मापे देऊन मिळकतीची घरफाळा आकारणी केली याबाबत आम्ही भाजपा-ताराराणी आघाडी पक्ष मार्फत सभागृहात देखील ध्वनीफीती व चित्रफिती दाखवल्या होत्या तरी मुळात सर्व मिळकतीचे योग्य खानेसुमारी केलेस व प्रामाणिकपणे कर निर्धरण केलेस घरफाळा वाढ करण्याची गरज भासणार नाही. पाणीपट्टी बाबातही तीच परिस्थिती आहे. अनेक मिळकतीचे पाणी मीटर बंद असून ती सरासरीने आकारली जात आहे. या सर्व बाबींचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक पुरवठा होणार असल्याने घरफाळा वाढ अगर पाणीपट्टी वाढ करण्याची गरज भासणार नाही.


कोल्हापूर महानगरपालिकेतील अनेक धनदांडगे व राजकीय पुढारी यांच्या मिळकतींना घरफाळा आकारणीच केलेली नाही. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अंदाजे 20000 मिळकतींना घरफाळा करणे न करता झीरो बिलिंग करण्यात आलेली आहेत. या घरांची घरफळा आकारणी केलेस कोट्यावधी रुपयाचा घरफाळा वसूल करता येणार आहे. 

सदर बाबत अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर कोल्हापुरातील मा.नाम. तेजस पाटील भागीदार अगर संचालक असलेल्या सयाजी हॉटेल डी.वाय.पी. हॉस्पिटॅलिटी ला घरफाळा आकारणी ही पूर्णत: चुकीचे व बेकायदेशीर करण्यात आलेली आहे. सदरचे हॉटेल मध्ये असलेले पि.व्ही.आर. शॉपर्स स्टॉप, कॉन्फरन्स व पार्टी हॉल, रेस्टॉरंट, बार व अन्य 30 इतक्या मिळकती या भाड्याने दिलेल्या असून घरफाळा आकारणी खुद्द मालक वहिवाट नुसार केलेली आहे. याउपर मिळकतीची मापे देखील चुकीची दाखविले आहेत व अशाप्रकारे महानगरपालिकेत करोडो रुपयाचा घरफाळा बुडवला आहे. तसेच ड्रीम वर्ल्ड अम्युजमेंट वॉटर पार्क या मिळकतीचा सन 1997  रोजी पासून फळा थकीत असून आज रोजी अखेर दंडा व्यतिरीक्त 91,63,252/- इतकी रक्कम बुडवली आहे. 

कारखाना तुमच्या अशा या मुळे महानगरपालिकेची आर्थिक लूट होत आहे व या लुटीचे परिणाम लोकेश होत आहे. वही लुट भरून काढण्याकरिता सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. हॅलो निषेधार्थ असून या लुटारूंविरुद्ध कडक कारवाई व्हावी. व या लुटारूंविरुद्ध आम्ही कायद्याची, रस्त्यावरची व जनतेसोबत ची अशी सर्व प्रकारची लढाई लढू असे यावेळी माजी खासदार धनंजय मुन्ना साहेब महाडिक यांनी सर्व पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget