पत्रकार सुरक्षा समिती प्रभारी राज्य कार्याध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची निवड

 



सोलापूर -पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे होते

या बैठकीत

पत्रकार संरक्षण कायदा

जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना

पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी

पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना

राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी

यादीवर नसलेल्या वृतपत्र ना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती

राज्यातील युट्युब चॅनल ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे

कोरोना मुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला तात्काळ पन्नास लाख रुपये मदत व शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती प्रभारी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी  साप्ताहिक ठिणगी, दैनिक कृषीवेल चे आक्रमक व झुंजार पत्रकार म्हूणन परिचित असलेले पंढरपूर येथील रामचंद्र सरवदे यांची एकमताने निवड करण्यात आली

पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्रालयासमोर उपोषण करणार- यशवंत पवार

राज्यात पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून राज्यसरकार पत्रकारांच्या बाबतीत कमालीचे उदासीन असून झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकार ला जाग आणण्यासाठी मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली असून जोपर्यंत राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंतगप्प बसणार नसल्याची ग्वाही या बैठकीत पत्रकारांना दिली

पत्रकारांच्या प्रश्नावर कायम संघर्ष करणार- नूतन प्रभारी राज्य कार्याध्यक्ष रामचंद्र सरवदे

गेली अनेक वर्षापासून आपण पत्रकारिता करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नाची आपणास जाणीव असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार बरोबर कायम संघर्ष करणार असल्याची माहिती नूतन प्रभारी राज्य कार्याध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली असून अभ्यासू पत्रकारची निवड झाल्याने शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे

या निवडीची घोषणा राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे यांनी केली आहे सूत्रसंचालन शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव अभिषेक चिलका यांनी केले आहे

या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार संपर्क प्रमुख  लक्ष्मण गणपा राजेंद्र पवार, अक्षय बबलाद, मुस्ताक कारभारी, विवेक खेत्री, सिद्राम येलदी, वैजिनाथ बिराजदार, संतोष खलाटे, कृष्णा गुट्टल, इस्माईल शेख  हनुमंत माने, डी डी पांढरे, सप्तगिरी गोसकी, चरण गाजरला बाहुबली जैन, सुनील गुमटे, नंदकुमार कांबळे, विष्णू सुरवसे, मोहंमद शेख, अशोक माचन, अंबादास येलगेटी सतीश गडकरी सह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget