अखेर महाळुंग-श्रीपूर ग्रामपंचायती चे, नगरपंचायती मध्ये रूपांतर

 



शासन निर्णय सोशल मीडियावर व्हायरल शासन निर्णयाचे केले स्वागत. सर्व ग्रामस्थांचे मानले आभार


सोलापूर // प्रतिनिधी 

महाळुंग-श्रीपूर ता. माळशिरस विस्ताराने सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत. महाळुंग-श्रीपूरकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार यशस्वी करून दाखवला. ग्रामस्थांनी एकजूट दाखवून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली नाही. कोणीही निवडणुकीचा फॉर्म भरला नाही. नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया होऊन सुद्धा शासनाने ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली होती. सर्व ग्रामस्थांकडून मुंबई उच्च न्यायालयांमध्ये ग्रामपंचायत बरखास्त करून, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत शासनाने जाहीर करून पुढील प्रक्रिया ताबडतोब राबवावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सरकारी वकील, याचिकाकर्ता यांचा वकील यामध्ये दोन वेळा सुनावणी देखील झाली होती. हे फायनल होण्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने महाळुंग-श्रीपूर नगर पंचायत रूपांतर केल्याचा शासन निर्णय ९ मार्च २०२१ रोजी काढला. तो संबंधित सर्व शासकीय ऑफिसला पाठवण्यात आला आणि सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाला.


ही बातमी मंगळवारी सायंकाळी समजताच, महाळुंग श्रीपूर मध्ये फटाक्यांची अतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. सोशल मीडिया वरती कार्यकर्त्यांचे आपल्या नेते मंडळींना श्रेय देण्याचे सोशल वॉर सुरू झाले. फेसबूक, व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावरती कॉमेंट्स देखील होऊ लागल्या. गावातील पार्टी प्रमुख आणि नेते मंडळींनी बुधवारी सकाळी यमाईदेवी मंदिरामध्ये सर्व गावकऱ्यांचे आभार मानण्यासाठी एकत्रित आले. ग्रामस्थांचे आभार देखील मानले. अनेक नेतेमंडळींनी, ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले.  नंतर बाजूला गटागटाने खाजगी चर्चा होऊ लागल्या. 


एकंदरीत तीन महिन्यापूर्वी चे चित्र पाहिले असता महाळुंग-श्रीपूर मधील ग्रामस्थांनी पूर्ण महाराष्ट्राला गावकऱ्यांची एकता दाखवून दिली. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली नाही. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. ऍडवोकेट बनसोडे यांनी मुद्देसूद मांडणी करून शासनाला नगर पंचायती मध्ये रूपांतर करण्यासाठी भाग पडत असतानाच, महाराष्ट्र शासनाने वेळीच निर्णय घेतला, नगर विकास मंत्रालयाने शासन निर्णय काढला.  त्यामुळे हा सर्व विजय महाळुंग-श्रीपूर मधील ग्रामस्थांच्या एकतेचा झालेला आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget