सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे व त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी बोगस बांधकाम कामगार नोंदणी करून शासनाच्या कोट्यावधी रूपयाचे भ्रष्टाचार केला आहे . या भ्रष्टाचाराची उच्च स्थरीय चौकशी करण्यात यावी , अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त यांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते . विशेष करून सोलापूरात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार बंधु - भगिर्नीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे समस्या ही तितक्याच आहेत . या कामगारांमध्ये यंत्रमाग , विडी , असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार तसेच बांधकाम कामगार यांचाही समावेश आहे . असंघटित क्षेत्रातील विविध कामगारांच्या समस्या व हक्क मिळविण्यासाठी आमच्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा विविध समस्या बाबत लेखी निवेदन देऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याचे विनंती केली . परंतु सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे साहेब हे निवेदना बाबत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत . किंवा समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत नाहीत . म्हणून कामगार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही चौकशी करण्यास गेल्यास आपल्याला पत्राद्वारे कळविण्यात येईल आपण वारंवार कार्यालयास येऊ नका असे ठासुन सांगुन परत पाठवितात अशा प्रकारामुळे कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा दिवसेंदिवस सोलापूरातील समस्या ह्या वाढतच आहेत . परंतु सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे साहेब यांच्या कामकाजात कुठलेही सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नाहीत . अशाप्रकारे श्री . येलगुंडे साहेब कारखानदारांच्या सोयीचे काम करीत असल्याचे दिसुन येते .
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सामाजिक सुरक्षा प्राप्त करावी . आणि त्यांना आधार मिळावे म्हणुन शासनामार्फत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत . सदर योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधीत जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे गरजेचे आहे . म्हणुन सोलापूरातील बांधकाम कामगारांची नोंदणी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी कामकाज चालते . या नोंदणी मध्ये सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे त्यांच्या कार्यालयातील सौ . देऊळकर मॅडम इतर अधिकारी , कर्मचारी यांनी स्वत : चे निर्माण केलेले खाजगी दलालांना हाताशी धरून संगनमताने बोगस बांधकाम कामगारांची मोठ्याप्रमाणे नोंदणी करून शासनाचे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा व अष्टाचार करून , भ्रष्टाचार करीत आहेत . याबाबत आमच्या संघटनेच्या वतीने शासन व प्रशासन दरबारी लोकशाही मार्गान सोलापूर सहाय्यक कामगा आयुक्त श्री . निलेश येलगुंडे यांनी पदाचा दुरुपयोग करून कोट्यावधी रुपयाचा केलेला भ्रष्टाचाराची चौकशी करावी . आणि निलेश येलगुंडे व सौ . देऊळकर मॅडम त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करावे , अशी मागणी करीत आहोत .
तरी माननीयांनी महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त या नात्याने आपणास विनंती करीत आहोत की , सोलापूर सहाय्यक कामगार श्री . बेलगुंडे व सौ . देऊळकर मॅडम त्यांच्या सहकाऱ्यांना निलंबित करून बांधकाम कामगार बोगस नोंदणीची चौकशी करून दोर्षीवर कायदेशीर कारवाई करावी . ही नम्म विनंती . असे नमुद करण्यात आले आहे .
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कु -हाडकर , दशरथ नंदाल , पप्पु शेख , शिवा ढोकळे , प्रशांत जक्का , श्रीनिवास बोगा यांचा समावेश होतो .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.